नांदेडमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या

वडिलांच्या आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे.

नांदेडमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या

नांदेड : नांदेडमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याच्या तरुण मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूजा शिरगिरे असं तिचं नाव असून ती अवघ्या सतरा वर्षांची होती.  किनवट तालुक्यातील गोकुंदा गावात ही घटना घडली आहे.

वडिलांच्या आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. अवघ्या 17 वर्षाच्या मुलीनं आत्महत्या केल्यानं शिरगिरे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

भविष्यात शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आत्महत्या करत असल्याचं तिनं सुसाइट नोटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV