उत्पादन खर्च परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतात शेळ्या सोडल्या

भाजीपाल्याला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने आज अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्यांनी अनोखं आंदोलन केलं. श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील शेतकऱ्यांनी सरकारपर्यंत आपल्या व्यथा पोहोचवण्यासाठी भाजीपाल्याच्या शेतामध्ये मेंढरांना सोडून आंदोलन केलं.

उत्पादन खर्च परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतात शेळ्या सोडल्या

अहमदनगर : भाजीपाल्याला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने आज अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्यांनी अनोखं आंदोलन केलं. श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील शेतकऱ्यांनी सरकारपर्यंत आपल्या व्यथा पोहोचवण्यासाठी भाजीपाल्याच्या शेतामध्ये मेंढरांना सोडून आंदोलन केलं.

वाजत गाजत या शेळ्या-मेंढ्यांची मिरवणूक काढून शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या भाजीपाल्यात त्यांना चरायला सोडलं. कुठल्याही भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतातील उभे पिक तोडणंही परवडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे पाऊल उचललं आहे. सरकारचं धोरण शेतकऱ्यांना मारायला निघाले असून आम्ही जगायचं कसं? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

आपल्या शेतीला जिवापाड जपणाऱ्या बापाला आज शेतात मेंढरांना सोडताना बघून वैष्णवी या चिमुकलीलाही अश्रू अनावर झाले.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: farmers protest with goats for guaranteed rate to crop latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV