पंढरपुरात ऊसदर आंदोलनं चिघळलं, एसटीची तोडफोड

ऊसदरावर तोडगा काढण्यासाठी दुपारी सोलापूर इथं जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे.

पंढरपुरात ऊसदर आंदोलनं चिघळलं, एसटीची तोडफोड

सोलापूर : राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यात ऊसदराचं आंदोलन चिघळलं आहे. पंढरपुरात ठिकठिकाणी आंदोलकांचा उद्रेक पाहायला मिळाल्या.

कोरटी इथे आंदोलकांनी एसटी बस फोडली. तर आज पहाटे कराड-उस्मानाबाद बसमधून प्रवाशांना उतरवून आंदोलकांनी एसटीची तोडफोड केली. आंदोलकांनी बसच्या काचा फोडून टायरमधील हवा सोडली.

दुसरीकडे गुरुवारी संध्याकाळी अनवली इथे जत डेपोची एक बस आणि एका ट्रकची तोडफोड करण्यात आली होती.

ऊसदरावर तोडगा काढण्यासाठी दुपारी सोलापूर इथं जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. यात तोडगा न निघाल्यास मात्र अहमदनगरप्रमाणे हे आंदोलनही पेटण्याची शक्यता आहे.

नगरमध्ये पोलिसांचा हवेत गोळीबार, 2 जखमी


ऊसाला 3100 रुपये दर द्यावा यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. शेवगावमध्ये आंदोलकांनी जाळपोळ केली, तर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडले. इतकंच नाही तर पोलिसांनी हवेत गोळीबारही केल्याचं सांगण्यात येत आहे.

या गोळीबारात भगवान मापारी आणि बाबूराव तुकळे हे दोन शेतकरी जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. दोन्हीही शेतकरी पैठणचे रहिवासी आहे.

संबंधित बातम्या




महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Farmer’s stir for sugarcane FRP turns violent in Pandharpur
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV