संतप्त शेतकऱ्यांचा औरंगाबादमध्ये तूर जाळण्याचा प्रयत्न

औरंगाबादमधील तूर खरेदी केंद्रावर आज शुक्रवारी शेतकऱ्यांनी तूर जाळण्याचा प्रयत्न केला. तूर गुणवत्ता निकषांवरुन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. त्यावर नाराजी नोंदवत शेतकऱ्यांनी तूर जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

संतप्त शेतकऱ्यांचा औरंगाबादमध्ये तूर जाळण्याचा प्रयत्न

औरंगाबाद : औरंगाबादमधील तूर खरेदी केंद्रावर आज शुक्रवारी शेतकऱ्यांनी तूर जाळण्याचा प्रयत्न केला. तूर गुणवत्ता निकषांवरुन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. त्यावर नाराजी नोंदवत शेतकऱ्यांनी तूर जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

चांगल्या प्रतीची तूर खरेदी करण्यास खरेदी केंद्र नकार देत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेली तूर जाळण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, विभागवार तुरीची ओळख करण्यासाठी सुतळीच्या रंगाचा आधार घेतला जात असल्यानं तूर खरेदीला आधीच उशीर होत आहे. त्यात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्यानं शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: farmers tries to burn toor in aurangabad latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV