जीएसटीमुळे खतांच्या किंमतीत 5 ते 70 रुपयांनी घसरण

fertilizer rates decrease after GST latest updates

प्रातिनिधिक फोटो

हिंगोली/परभणी : एक जुलैपासून देशभरात लागू झालेल्या नवीन करप्रणालीमुळे व्यापारी आणि ग्राहकांमधून संमिश्र प्रतिक्रिया येत असताना, खतांची खरेदी करणारा शेतकरी मात्र खुश झाला आहे. त्याला कारण म्हणजे जीएसटीअंतर्गत 12 टक्क्यांवर असलेला स्लॅब खतांवर 5 टक्के भार लावला आहे. यामुळे खतांच्या जुन्या किमतीत 5 ते 70 रुपयांची घसरण झाली आहे. विशेष म्हणजे खत विक्री करणाऱ्या कंपन्यांनी त्यानुसार नवीन दरपत्रक जाहीर केले आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या जीएसटी या करप्रणालीमध्ये शेतीशी निगडीत बियाणे जीएसटीमुक्त करण्यात आले आहे. खतांवर पाच टक्के कर लावण्यात आला आहे. यापूर्वी हा कर 12 टक्क्यांवर होता. यामुळे कमी झालेल्या या कराने खतांच्या पोत्याचा भावही खाली आला आहे. त्यामुळे खतांच्या नव्या दरामुळे 5 ते  70 रुपयांची बचत होणार आहे. बाजारात खत विक्री करणाऱ्या कंपन्यांनीही एक जुलैपासून नवीन कारांनुसार दरपत्रक काढले आहे. त्यामुळे बाजारातही मोठ्या प्रमाणात खत खरेदी सुरु झाली आहे.

खते                 जुने भाव                  नवीन भाव

युरिया                 300                         294

डीएपी                1100                        1078

20.20.0.13     800                          784

 

सध्या पेरणी आणि मशागतीची दिवस असून शेतकरी शेतीमध्ये कामाला लागले आहेत. त्याचवेळी लागू झालेल्या नवीन करप्रणालीमुळे खताचे भाव खाली आले आहेत. यामुळे ऐन पेरणी आणि मशागतीच्या वेळी शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. बाजारात खतांची मोठ्या प्रमाणात आवकही आहे. यामुळे हवी ती खते मिळत आहेत, तीही आधीपेक्षा कमी भावात. यामुळे होत असलेल्या पैशांच्या बचतीचा आनंद शेतकऱ्यांमध्ये दिसतो आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन करप्रणाली बद्दल अनेक मते आणि मतांतरे समोर येत आहेत. काही ठिकाणी नाराजीचा सूरही ऐकायला येतो आहे. पण शेती जगतात मात्र या कमी झालेल्या भावांमुळे शेतकरी आनंदी आहे हे नक्की.

Agriculture News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:fertilizer rates decrease after GST latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: fertilizer GST खते जीएसटी
First Published:

Related Stories

येत्या दोन वर्षात ऊसाचं 3 लाख 5 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार
येत्या दोन वर्षात ऊसाचं 3 लाख 5 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

मुंबई : आगामी दोन वर्षात राज्यातील ऊस पिकाखालील 3 लाख 5 हजार हेक्टर

ऊस लागवडीसाठी ठिबक सिंचन बंधनकारक, मंत्रिमंडळाचा निर्णय
ऊस लागवडीसाठी ठिबक सिंचन बंधनकारक, मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई: यापुढे तुम्हाला ऊस लागवड करायची असेल, तर त्यासाठी ठिबक सिंचन

आकडेवारी : आतापर्यंत महाराष्ट्रात किती पाऊस पडला?
आकडेवारी : आतापर्यंत महाराष्ट्रात किती पाऊस पडला?

मुंबई : गेले काही दिवस राज्यभरात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे

येत्या 72 तासात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस, हवामान खात्याचा नवा अंदाज
येत्या 72 तासात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस, हवामान खात्याचा नवा अंदाज

मुंबई : हवामान खात्याने पुन्हा एकदा पावसाचा नवा अंदाज वर्तवला आहे.

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 09/07/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 09/07/2017

  गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिवसेना आमदार, खासदार आणि मंत्र्यांची

तीन ते चार दिवसात पावसाचं पुनरागमन, हवामान खात्याचा अंदाज
तीन ते चार दिवसात पावसाचं पुनरागमन, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा

वर्ध्यात शेतीमालासाठी 'रुरल मॉल' उभारणार
वर्ध्यात शेतीमालासाठी 'रुरल मॉल' उभारणार

वर्धा: शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध

राजू शेट्टींची किसान मुक्ती यात्रा, मेधा पाटकर, योगेंद्र यादवही सहभागी
राजू शेट्टींची किसान मुक्ती यात्रा, मेधा पाटकर, योगेंद्र यादवही...

भोपाळ: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या

कर्जमाफी योजनेत 2009 नंतरच्या थकीत कर्जदारांचाही समावेश
कर्जमाफी योजनेत 2009 नंतरच्या थकीत कर्जदारांचाही समावेश

मुंबई : कर्जमाफीच्या ऐतिहासिक योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय

लवकरच मुंबईतील शेतकऱ्यांची नावं जाहीर करणार : मुख्यमंत्री
लवकरच मुंबईतील शेतकऱ्यांची नावं जाहीर करणार : मुख्यमंत्री

मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरुन जाहीर करण्यात