चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या दोन गटात तुंबळ हाणामारी

चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी आलेल्या निरीक्षकांपुढेच दोन गटात तुंबळ हाणामारी झाली.

चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या दोन गटात तुंबळ हाणामारी

चंद्रपूर :  चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी आलेल्या निरीक्षकांपुढेच दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. पक्ष निरीक्षकांना ठरलेल्या ठिकाणाऐवजी दुसऱ्याच उपस्थित असल्याचे सांगितल्याने माजी खासदार नरेश पुगलिया गटाने गोंधळ घातला. यातून पुगलिया आणि विजय वड्डेटीवार गटात जोरदार हाणामारी झाली.

चंद्रपूरच्या संघटनात्मक निवडणुकांसाठी आज झारखंडचे पक्ष पदाधिकारी रामगोपाल भवनिया शहरात आले होते. शहरातील शासकीय विश्रामगृहात पक्ष निरीक्षक येणार, अशी माहिती पुगलिया समर्थकांना देण्यात आली होती.

मात्र, वडेट्टीवार यांच्या गटाने पक्ष निरीक्षकांना बल्लारपूर बायपास मार्गावरील इंटक भवनात कार्यक्रम असल्याचे सांगितलं. त्यानुसार निरीक्षक इंटक भवनात पोहोचले. पण तिथे निरिक्षक उपस्थित नसल्याची माहिती मिळताच, फसवणूक झाल्याची भावना झालेल्या पुगलिया समर्थकांनी इंटक भवनात धाव घेतली.

यानंतर वडेट्टीवार आणि पुगालिया या दोन्ही गटात एकच गोंधळ उडाला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर, त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. यानंतर त्याचे पर्यावसन तुंबळ हाणामारीत झाले.

दरम्यान, हा सर्व प्रकार पक्षाला लाजिरवाणा असल्याची प्रतिक्रिया पक्ष निरीक्षकांनी नोंदविली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV