काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

महिलेकडून 12 हजार रुपये उकळणाऱ्या चंद्रपूरच्या काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडेंवर खंडणी वसूल केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

चंद्रपूर : काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे यांच्यावर खंडणी वसूल केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

पती-पत्नीच्या एका कौटुंबिक वादात प्रकरण मिटविण्यासाठी पोलिसांना पैसे द्यावे लागतात असं सांगून अश्विनी खोब्रागडे यांनी पीडित महिलेकडून १२ हजार रुपये उकळले. फिर्यादी महिलेने अश्विनी खोब्रागडे यांना ५ हजार दिले. मात्र, कौटुंबिक वादाचे हे प्रकरण मिटत नसल्यामुळे तिने पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्याकडे तक्रार केली.

पती-पत्नीतील वाद मिटविण्यासाठी पोलिसांना पैसे द्यावे लागतात हे ऐकून पोलीस अधीक्षकांना देखील धक्का बसला आणि त्यांनी तक्रारीची शहानिशा करण्यासाठी ट्रॅप लावला. त्याप्रमाणे काल रात्री अश्विनी खोब्रागडे यांना ७ हजारांची लाच घेताना त्यांच्या घरीच रंगेहाथ पकडण्यात आलं. याप्रकरणी अश्विनी खोब्रागडेंवर खंडणी वसूल केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

VIDEO :

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV