पत्रकाराला शिवीगाळ, भाजपच्या पाशा पटेलांवर गुन्हा दाखल

पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे नेते पाशा पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार विष्णू बुरगे यांनी केलेल्या तक्रारीवरून पाशा पटेल यांच्याविरोधाच आज पहाटे एफआयआर दाखल करण्यात आली.

पत्रकाराला शिवीगाळ, भाजपच्या पाशा पटेलांवर गुन्हा दाखल

लातूर : पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे नेते पाशा पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पत्रकार विष्णू बुरगे यांनी केलेल्या तक्रारीवरून पाशा पटेल यांच्याविरोधाच आज पहाटे एफआयआर दाखल करण्यात आली.

केवळ पेट्रोल दरवाढीवर एका पत्रकारानं प्रश्न विचारल्यानंतर संताप अनावर झालेल्या पाशा पटेल यांनी पत्रकाराला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली .लातूर विश्रामगृहात हा सगळा प्रकार घडला.

विशेष म्हणजे, ही घटना घडली त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रविकांत तुपकर यांच्यासह पत्रकार आणि काही शेतकरीही उपस्थित होते.

‘पेट्रोलची भाववाढ झाली, शहरात येण्यासाठीही शेतकरी आता विचार करेल, सरकारने शेतकऱ्यांची वाट लावली का?’ असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला होता. त्यावर पाशा पटेल भडकले आणि शिवीगाळ केल्याचा दावा पत्रकाराने केला आहे.मला बसून प्रश्न वाचरतो का औकात आहे का, असं बोलत पाशा पटेल यांनी प्रचंड शिवीगाळ केली.

हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात रेकॉर्ड झालं आहे. पत्रकार विष्णू भुरगे यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे. त्यानंतर पाशा पटेल यांच्यावर आज पहाटे गुन्हा नोंद करण्यात आला.

दरम्यान, स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बसून संबंधित व्यक्तीने माझा अपमान केल्याचा दावा पाशा पटेल यांनी केला आहे. ‘कार्यकर्त्याप्रमाणे तो माझ्याबरोबर बोलत होता. मी विचारलं, तुझं वय आहे का माझ्या वयाच्या व्यक्तीशी असं बोलण्याचं? त्यानंतर झालेल्या शाब्दिक चकमकीत माझा पारा चढला आणि मग त्या व्यक्तीने आपण पत्रकार असल्याचं सांगितलं’, असं पटेल म्हणाले.

संबंधित बातम्या

पेट्रोल दरवाढीवर प्रश्न, पत्रकाराला पाशा पटेलांची शिवीगाळ

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV