मिरजेतील म्युझिकल हाऊसच्या गोदामाला भीषण आग

मिरजेतील सराफ पेठेतील स्वरसंगम म्युझिकल हाऊसच्या गोदामाला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत म्युजिकल हाऊसमधील सतार बनवण्याचे सर्व साहित्य तसेच, लाखो रुपयांच्या सतारी जळून खाक झाल्या आहेत.

मिरजेतील म्युझिकल हाऊसच्या गोदामाला भीषण आग

सांगली : मिरजेतील सराफ पेठेतील स्वरसंगम म्युझिकल हाऊसच्या गोदामाला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत म्युजिकल हाऊसमधील सतार बनवण्याचे सर्व साहित्य तसेच, लाखो रुपयांच्या सतारी जळून खाक झाल्या आहेत.

मिरजेतील स्वरसंगम म्युझिकल हाऊस हे सतारीचे दुकान सर्वात जुने दुकान म्हणून ओळखले जाते. याच दुकानाला दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे सतार बनवण्याचे साहित्य, आणि सतार आणि इतर वाद्यांचे साहित्य जळून खाक झाल्या.

या आगीत सुमारे 80 लाखाचे तंतुवाद्याचे साहित्य जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पण अरुंद गल्लीत हे म्युझिकल हाऊसचे गोदाम आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमनच्या जवानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, मिरजेला शेकडो वर्षांची सतार बनवण्याची परंपरा आहे. इथल्या सतारींना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दिग्गज गायकांकडून मागणी असते.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: fire at swarsangam musical house in miraj
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV