नागपूरमधील मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर सेमिनरी हिल्स परिसरात आग

नागपूरमधील मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर सेमिनरी हिल्स परिसरात आग

नागपूर: नागपुरातील सेमिनरी हिल्स जंगलात मोठी आग लागली होती. संध्याकाळी 7.30च्या सुमारास अचानक या भागात आगीचे लोळ दिसू लागले. जंगलाचा मोठा भाग या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान सेमिनरी हिल्सला लागून आहे. अग्नीशमनदलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे.

तर दुसरीकडं गोंदियातील देवरी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग सहा लगतच्या महाराष्ट्र वन विकास मंडळाच्या लाकूड आगाराला मोठी आग लागली. तब्बल 5 एकरमध्ये असलेल्या लाकडाला आग लागल्यानं मोठं नुकसान झालं.

दरम्यान, या दोन्हीही ठिकाणच्या आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचा सध्या तपास सुरु आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: FIRE Nagpur seminari hills area
First Published:

Related Stories

LiveTV