‘मला अडकवण्यासाठी कौरवनितीचा वापर’, भिडे गुरुजींची पहिली प्रतिक्रिया

‘अगदी न्यायालयीन, सीबीआय चौकशी नेमावी. कोणत्याही चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे. हवं तर यमाला अध्यक्ष करुन एखादी समिती नेमा. आणखी काय सांगू...

‘मला अडकवण्यासाठी कौरवनितीचा वापर’, भिडे गुरुजींची पहिली प्रतिक्रिया

सांगली : ‘शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो’, असं सांगत भिडे गुरुजी यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हिंसाचाराच्या आरोपानंतर भिडे गुरुजी यांनी माध्यमांशी प्रथमच संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हिंसाचाराची सखोल चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.

कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी निराधार आरोप केले जात आहे. सरकारनं कुठल्याही यंत्रणांमार्फत चौकशी करावी. असं आव्हानही भिडे गुरुजी यांनी दिलं आहे. हिंसाचाराच्या आरोपानंतर ते पहिल्यांदाच माध्यमांशी बोलत होते.

नेमकं काय म्हणाले भिडे गुरुजी?
‘अगदी न्यायालयीन, सीबीआय चौकशी नेमावी. कोणत्याही चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे. हवं तर यमाला अध्यक्ष करुन एखादी यंत्रणा नेमावी. आणखी काय सांगू... भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटे यांनी ही दंगल पेटवली हे कितपत शक्य तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, एखादा खगोलशास्त्रज्ञ जर म्हणत असेल की, हो... मी अमावस्येच्या दिवशी रात्री 12 वाजता पूर्वेला सूर्य पाहिलाय. ते जितकं सत्य तितकंच हे सत्य आहे. आणखीन काय सांगू...’ असं भिडे गुरुजी यावेळी म्हणाले.

भिडे गुरुजींच्याविरोधात पिंपरी आणि औरंगाबाद इथं अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी मुंबईत होणारं भिडे गुरुजींच्या व्याख्यानाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.संबंधित बातम्या :

देशाचे तुकडे होण्याआधी मी मरण पत्करेन : उदयनराजे

भिडे गुरुजी वडीलधारे, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही : उदयनराजे

प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर भिडे गुरुजींचं स्पष्टीकरण

कोरेगाव-भीमामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाकडून शांततेचं आवाहन

कोरेगाव भीमातील हिंसाचार सरकारच्या हलगर्जीमुळे : ग्रामस्थ

थर्टी फर्स्ट ते महाराष्ट्र बंद, पोलीस ऑन ड्युटी 72 तास

भिडे गुरुजींवरील गुन्हा मागे घ्या, सांगलीत समर्थनार्थ मोर्चा

दलित तरुणांची धरपकड तात्काळ थांबवावी : प्रकाश आंबेडकर

दलित समाज धाकटा भाऊ, सर्वांना एकत्र नांदायचं आहे : छत्रपती संभाजीराजे

सणसवाडी दगडफेकीच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद

पुण्यातील सणसवाडीत दोन गटात वाद, परिस्थिती नियंत्रणात

सणसवाडी दगडफेकीची न्यायालयीन चौकशी होणार : मुख्यमंत्री

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: First reaction to Bhide Guruji’s in front of media latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV