सोलापूर-तुळजापूर रोडवर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

सोलापूर-तुळजापूर रोडवर हॉटेल शीतलजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

सोलापूर-तुळजापूर रोडवर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

 

सोलापूर : सोलापूर-तुळजापूर रोडवर हॉटेल शीतलजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका कारला प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपनं जोरदार धडक दिली. ज्यामध्ये एका पोलीस शिपायासह पाच जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत.

जीप चालकाचं नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारलाच थेट धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, ज्यात कारचा संपूर्ण चुराडा झाला. तर धडक देणारी जीपही पलटी झाली. दरम्यान, मृतांमध्ये तीन जण कर्नाटकातील असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Five people died in car accident on Solapur Tuljapur road latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV