जळगावातल्या चिखली गावात पायी जाणाऱ्या चौघांना टँकरनं चिरडलं

मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली गावाजवळ पायी जाणाऱ्या चौघांना टँकरने चिरडलं. मृतांमध्ये 13 महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे.

जळगावातल्या चिखली गावात पायी जाणाऱ्या चौघांना टँकरनं चिरडलं

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली गावाजवळ पायी जाणाऱ्या चौघांना टँकरने चिरडलं. मृतांमध्ये 13 महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे.

रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घोडसगाव येथून गोधन पवार यांचं कुटुंब चिखली गावाकडे जात होतं. यातील गोधन व त्यांचा मुलगा सायकलीवर तर अन्य पाच जण पायी जात होते.

यावेळी मुक्ताईनगरहून मलकापूरकडे जाणारा भरधाव टँकरने चौघांना जोरदार धडक दिली. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. यात अमरसिंग गोधन पवार (१३ महिने), निम्मीबाई गोधन पवार (३८), अल्कोस पवार (आठ), उड्डीया गोधन पवार (६) हे जागीच ठार झाले.

तर टँकरचा जोरदार धडकेने निहाल गोधन पवार हा गंभीर जखमी झाला आहे. अपघातातून गोधन व नेहा बाई हे दोघे बचावले आहेत.

अपघातानंतर टँकर चालक पसार झाला आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: four dead on road accident in chikhli gaon near jalgaon latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV