नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक, विद्यापीठाच्या उपकुलसचिवांविरोधात गुन्हा

नोकरीचं आमिष दाखवून विद्यापीठाच्या उपकुलसचिवांनी 6 लाख रुपये घेतल्याचा आरोप देवराव चव्हाण नावाच्या तरुणाने केला आहे. औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हा प्रकार घडला आहे. विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. ईश्वर मंझा यांना पोलिसांनी अटक केली आहे.

नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक, विद्यापीठाच्या उपकुलसचिवांविरोधात गुन्हा

औरंगाबाद : नोकरीचं आमिष दाखवून विद्यापीठाच्या उपकुलसचिवांनी 6 लाख रुपये घेतल्याचा आरोप देवराव चव्हाण नावाच्या तरुणाने केला आहे. औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हा प्रकार घडला आहे. विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. ईश्वर मंझा यांना पोलिसांनी अटक केली आहे.

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक आणि धनादेश अनादर प्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. ईश्वर मंझा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयात कारकुनाची नोकरी लावण्यासाठी मंझा यांनी देवरावकडून 6 लाख रुपये घेतले होते. मात्र तरुणाला नोकरी लागली नाही. नोकरी लावण्यासाठी घेतलेले पैसे तरुणाने परत मागितले असता त्यांनी दोन वेळा धनादेश दिले. मात्र तेही वटले नाहीत.

शेवटी तरुणाने छावणी पोलीस स्टेशनमध्ये उपकुलसचिवांविरोधात तक्रार दाखल केली. चिकलठाण येथील देवराव चव्हाण यांच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी रात्री त्यांना अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: fraud case registered against Deputy Registrar in marathwada university aurangabad latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV