नागपूरच्या आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By: | Last Updated: > Thursday, 20 April 2017 8:42 PM
नागपूरच्या आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

नागपूर: नागपूरच्या आमदार निवासच्या रूम नंबर 320 एकमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पीडित मुलगी एका ज्वेलर्सच्या दुकानात काम करत होती. त्याच दुकानाच्या मालकानं या मुलीवर बलात्कार केला आहे. घरातून भोपाळला कुटुंबासोबत फिरायला जातोय म्हणत दुकानदारानं मुलीला फूस लावली आणि चार दिवस आमदार निवासात बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी ज्वेलर्स मालक मनोज भगत आणि रजत मदरे या दोघांना अटक केली आहे.

या प्रकरणामुळे आमदार निवासाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे शासनानं लक्ष द्यावं अशी मागणी आता जोर धरत आहे. खरं पाहायला गेलं तर आमदार निवासात आमदार कधीच राहत नाही. त्यांचे कार्यकर्ते कायम या ठिकाणी राहतात. त्यामुळे आता आमदार निवासाबाबत काही नियमावली देखील तयार करण्यात यावी अशीही मागणी होत आहे.

दरम्यान, याप्रकरणी शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी पोलिसांच्या भूमिकेबद्दलही प्रश्न उपस्थित केला आहे. ‘आमदार निवासात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतो. त्यामुळे अशा ठिकाणी एका अल्पवयीन मुलीला नेलंच कसं?’  असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

First Published:

Related Stories

पुनर्वसन झालेल्या माळीणची पहिल्याच पावसात बिकट अवस्था
पुनर्वसन झालेल्या माळीणची पहिल्याच पावसात बिकट अवस्था

पुणे : पुनर्वसन झालेल्या माळीणची पहिल्या पावसात बिकट अवस्था झाली

ज्ञानेश्वरांच्या पालखीचं आज चांदोबा लिंब इथं पहिलं रिंगण
ज्ञानेश्वरांच्या पालखीचं आज चांदोबा लिंब इथं पहिलं रिंगण

सातारा : संत ज्ञानोबांची पालखी आज लोणंदहून मार्गस्थ होऊन रात्री

मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाचं दमदार पुनरागमन
मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाचं दमदार पुनरागमन

मुंबई : रविवारी वरुणराजा मुंबईकरांवर मेहेरबान झाला असून, मोठ्या

पाणीप्रश्नी खडसे आक्रमक, उपोषणाचा इशारा
पाणीप्रश्नी खडसे आक्रमक, उपोषणाचा इशारा

जळगाव : राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर

शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कसा झाला?
शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कसा झाला?

मुंबई : राज्यातील सुमारे 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017 1.    राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांचं

सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली : रघुनाथदादा
सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली : रघुनाथदादा

मुंबई : राज्य सरकारने 34 हजार कोटींची कर्जमाफी केली असली, तरी शेतकरी

शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी
शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी

मुंबई : राज्यातील सुमारे 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची

दीड लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी होणार : सूत्र
दीड लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी होणार : सूत्र

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारचा प्लान