कोल्डड्रिंकमधून दारु पाजली, वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या महिलेवर बलात्कार

वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या विवाहितेवर सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली आहे.

By: | Last Updated: 04 Nov 2017 05:21 PM
कोल्डड्रिंकमधून दारु पाजली, वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या महिलेवर बलात्कार

औरंगाबाद : वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या विवाहितेवर सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली आहे. या महिलेला कोल्डड्रिंकमधून दारु पाजून तिच्यावर चौघांनी अत्याचार केले आहेत.

गुरुवारी 2 नोव्हेंबरला रात्री ही महिला वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी मित्रासोबत गेली होती. शहराजवळील टाकळी शिवारात नेऊन महिलेला आरोपींनी कोल्डड्रिंकमधून दारु पाजली आणि त्यानंतर तिच्यावर चौघांनीही बलात्कार केला.

याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर याप्रकरणी अनिल वसंत ठोंबरे या आरोपीला अटकही करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: gangrape on lady in aurangabad latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV