आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत गिरीश महाजनांचं लेझीम नृत्य

गिरीश महाजन हे गेल्या 25 वर्षांपासून आपल्या मतदारसंघात म्हणजेच जामनेर शहरात आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहेत.

आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत गिरीश महाजनांचं लेझीम नृत्य

जळगाव : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील लेझीम खेळताना पाहायला मिळाले.

गिरीश महाजन हे गेल्या 25 वर्षांपासून आपल्या मतदारसंघात म्हणजेच जामनेर शहरात आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहेत. या मिरवणुकीमध्ये ते केवळ सहभागीच नव्हे तर त्यात लेझीमच्या तालावर सबंध मिरवणूकभर नाचत देखील असतात. राज्याचे जलसंपदा मंत्री हे पद मिळाल्यावर देखील त्यांनी आपली ही परंपरा कायम ठेवली आहे.

जामनेर शहरात जयभीम नगरातून निघालेल्या मिरवणुकीत खास निळा शर्ट परिधान करुन मोठ्या उत्साहात गिरीश महाजन हे कार्यकर्त्यांसोबत लेझीमच्या तालावर नाचत असताना बघायला मिळाले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन उपस्थितांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

पाहा व्हिडीओ :

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: girish mahajan lazim lance in ambedkar jayanti
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV