गोकुळचा शेतकऱ्यांना झटका, गायीच्या दूध खरेदीदरात 2 रुपयांची कपात!

गोकुळने आजपासून गाईच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांची कपात केली आहे.

गोकुळचा शेतकऱ्यांना झटका, गायीच्या दूध खरेदीदरात 2 रुपयांची कपात!

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याला आणखी खाईत लोटण्याचा निर्णय घेतला आहे. गोकुळने आजपासून गाईच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांची कपात केली आहे. त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

पूर्वी 28 रुपये 50 पैशांनी खरेदी केलं जाणारं गायीचं दूध आता 26 रुपये 50 पैसे होणार आहे.

अतिरिक्त दुधात वाढ झाल्यामुळे खरेदी दरात कपात करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

लोणी आणि गाईच्या दुधाची पावडर स्वस्त झाली आहे. 225 रू किलोची पावडर 170 रु किलोपर्यंत घसरली आहे. तर लोणी 400 प्रती किलो वरून 275 रु प्रति किलो एवढ्या खाली आला आहे.

एकीकडे दूध संघाने खरेदी दरात कपात केली असली तरी विक्री दरात मात्र कोणतीही वाढ केलेली नाही. ग्राहकांना गायीचं दूध हे पूर्वीप्रमाणेच 45 रुपये प्रति लिटर दराने मिळणार आहे.

शेती शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Gokul cuts purchase price of cow milk by Rs 2
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV