गोंदियाच्या बाजारात 'आय लव्ह पाकिस्तान' छापलेले फुगे

शहरात कुठलेही चिमुकले किंवा व्यापारी 'आय लव्ह पाकिस्तान' लिहिलेले फुगे विकताना आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी असं आवाहन नागरिकांना केलं आहे.

गोंदियाच्या बाजारात 'आय लव्ह पाकिस्तान' छापलेले फुगे

गोंदिया : गोंदिया शहरात 'पाकिस्तान जिंदाबाद' लिहिलेल्या फुग्यांची विक्री होत असल्याचं उघडकीस आलं आहे. नवरात्रौत्सवात शहरातील विविध दुर्गा मंडपांजवळ युवा सेनेच्या तरुणांना लहान मुलं फुगे विकताना आढळली.

'पाकिस्तान जिंदाबाद', 'आय लव्ह यू पाकिस्तान' असं लिहिलेले फुगे विकले जात होते. विक्रेत्या चिमुरड्यांकडून सर्व फुगे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी विकत घेतले आणि गोंदिया शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.

फुगे विकणाऱ्या मुलांकडे याबाबत विचारणा करुन त्यांना सोडून देण्यात आलं. मात्र बाजारात हे फुगे नेमके आले कुठून, याचा शोध पोलिस घेत आहेत. गोंदिया शहर पोलिसांनी शहरातील फुगे व्यापाऱ्यांना बोलावून फुग्यांवरील लोगो तपासून पाहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी व्यापाऱ्यांना दिला आहे.

शहरात कुठलेही चिमुकले किंवा व्यापारी अशा पद्धतीचे फुगे विकताना आढळल्यास त्यांच्याविषयी माहिती  द्यावी असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV