हरिणाची बाईकवर झेप, अपघातात पोलिसाचा जागीच मृत्यू

अपघातात पोलिस शिपाई राजेंद्र दमाहे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत बाईकवर असलेले नंदू खेरे जखमी झाले

हरिणाची बाईकवर झेप, अपघातात पोलिसाचा जागीच मृत्यू

गोंदिया : दुचाकीवर अचानक हरणाने झेप घेतल्यामुळे झालेल्या अपघातात एका पोलिसाला प्राण गमवावे लागले आहेत. गोंदिया आमगाव मार्गावरील मानेगावच्या जंगलात हा दुर्दैवी अपघात घडला.

राजेंद्र दमाहे या पोलिस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. पोलिस अधीक्षक कार्यालयातील प्रशिक्षण संपवून दमाहे ड्यूटीवर रुजू होण्यासाठी बाईकवरुन चालले होते. त्यावेळी अचानक हरणानं झेप घेतल्यामुळे अपघात झाला.

अपघातात पोलिस शिपाई राजेंद्र दमाहे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत बाईकवर असलेले नंदू खेरे जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या अपघातात हरणाचाही मृत्यू झाला.

गोंदियातल्या मानेगावच्या जंगलात मोठ्या संख्येनं हरणांचं वास्तव्य आहे. असं असतानाही वन विभागानं कोणतेही सूचना फलक या ठिकाणी लावले नाहीत. परिणामी मुक्या जीवांसह आता माणसांनाही जीव गमवावा लागत आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Gondia : Deer jumps on bike, police died on the spot latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV