डॉ. अभय आणि राणी बंग यांना पद्मश्री, धोनीला पद्मभूषण!

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘पद्म’ पुरस्कारांची आज (गुरुवार) घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील डॉ. अभय बंग, राणी बंग यांना आरोग्य क्षेत्रातील कार्यासाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

डॉ. अभय आणि राणी बंग यांना पद्मश्री, धोनीला पद्मभूषण!

नवी दिल्ली : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘पद्म’ पुरस्कारांची आज (गुरुवार) घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील डॉ. अभय बंग, राणी बंग यांना आरोग्य क्षेत्रातील कार्यासाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

संगीतकार इलाई राजा आणि गुलाम मुस्तफा खान यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी आणि बिलियर्ड्सपटू पंकज अडवाणी यांची पद्मभूषणसाठी निवड करण्यात आली आहे.

यावर्षी एकूण 8पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये 3 पद्मविभूषण, 9 पद्मभूषण आणि  73 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यासह 14 माहिला तर 16 हे अप्रवासी भारतीयपरदेशी नागरिक आहेत. 3 मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.

यंदा 85 पैकी 11 पुरस्कारांवर महाराष्ट्राने मोहर उमटवली.

याशिवाय साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य कार्यबद्दल अरविंद गुप्ता, क्रीडाजगतात दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्रातील मुरलीकांत पेटकर आणि विजयालक्ष्मी नवनित कृष्ण यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तर संपत रामटेके यांना मरणोत्तार पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

केंद्र सरकारकडून पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वसंध्येला करण्यात येते. यंदाच्या वर्षात पुरस्कारासाठी 15,700 लोकांनी अर्ज केला होता. त्यातील काही जणांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशमधील भज्जू श्याम, केरळच्या लक्ष्मी कुट्टी, पश्चिम बंगालच्या सुधांशू बिस्वास, केरळच्या एमआर राजगोपाल यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

कला, साहित्य, शिक्षा, खेळ, चिकित्सा आणि सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार, उद्योग अशा क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा या पुरस्कारानं सन्मान करण्यात येतो.

पद्मविभूषण पुरस्कार 2018- 

  • इलाई राजा (संगीतकार )

  • गुलाम मुस्तफा खान (शास्त्रीय गायक)

  • परमेश्वरन (ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ )


पद्मभूषण पुरस्कार विजेते 2018 -
महेंद्रसिंग धोनी (क्रिकेटपटू), पंकज अडवाणी (बिलियर्डस खेळाडू), फिलीपोस मार ख्रिसोस्तोम (अध्यात्म), अलेक्झांडर कडाकिन (पब्लिक अफेअर्स), रामचंद्रन नागस्वामी (पुरातत्वशास्त्र), वेदप्रकाश नंदा (साहित्य व शिक्षण), लक्ष्मण पै (चित्रकला), अरविंद पारिख (संगीत), शारदा सिन्हा (संगीत)

पद्मश्री पुरस्कार विजेते 2018
डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग (वैद्यकीय क्षेत्र), दामोदर गणेश बापट (समाजसेवा), प्रफुल्ल गोविंद बरुआ (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता), मोहनस्वरुप भाटिया (लोकनृत्य), सुधांशू विश्वास (समाजसेवा), साईकोम मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग), पंडित श्यामलाल चतुर्वेदी (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता), जोस मा जोय (विदेशी नागरिक - व्यापार व उद्योग), लंग्पोक्लकपम सुबदानी देवी (विणकर), सोमदेव देवरामन (टेनिस खेळाडू), येशी धोडेन (वैद्यकीय क्षेत्र), अरुपकुमार दत्ता (साहित्य व शिक्षण), दोद्दारंगे गौडा (गीतकार), अरविंद गुप्ता (शिक्षण व साहित्य), दिगंबर हांडसा (साहित्य व शिक्षण), रामली बिन इब्राहिम (विदेशी नागरिक - नृत्य), अन्वर जलालपुरी (मरणोत्तर, क्षेत्र - साहित्य व शिक्षण), पियाँग तेमजेन जमीर (साहित्य व शिक्षण), सीतव्वा जोड्डाती (समाजसेवा), मालती जोशी (साहित्य व शिक्षण), मनोज जोशी (अभिनेता), रामेश्वरलाल काब्रा (व्यापार आणि उद्योग), प्राणकिशोर कौल (कला), बौनलप केओकांगना (विदेशी नागरिक - वास्तुविशारद), विजय किचलू (संगीत), टॉमि कोह (विदेशी नागरिक - पब्लिक अफेअर्स), लक्ष्मी कुट्टी (वैद्यकीय सेवा), जयश्री गोस्वामी महंता (साहित्य व शिक्षण), नारायणदास महाराज (अध्यात्म), प्रवकार महाराणा (शिल्पकार), हून मेनी (विदेशी नागरिक - पब्लिक अफेअर्स), नौफ मारवाई (योगशास्त्र), झवेरीलाल मेहता (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता), कृष्णाबिहारी मिश्रा (साहित्य व शिक्षण), शिशीर पुरुषोत्तम मिश्रा (चित्रपट), सुभाषिनी मिस्त्री (समाजसेवा), तोमिओ मिझोकामी (विदेशी नागरिक - साहित्य आणि शिक्षण), सोमदेत फ्रा महा मुनीवाँग (विदेशी नागरिक - अध्यात्म), केशवराव मुसळगावकर (साहित्य आणि शिक्षण), डॉ. थान्ट मिन्ट (विदेशी नागरिक - पब्लिक अफेअर्स), व्ही नानामल (योगशास्त्र), सुलागिट्टी नरसम्मा (समाजसेवा), विजयालक्ष्मी नवनीत कृष्णन (लोकसंगीत), आय न्योमन नोत्रा (विदेशी नागरिक - शिल्पकार), मलाई हाजी अब्दुल्ला बिन मलाई हाजी ओथमान (विदेशी नागरिक - समाजसेवा), गोवर्धन पणिका (विणकर), भवानीचरण पटनाईक (पब्लिक अफेअर्स), मुरलीकांत पेठकर (दिव्यांग जलतरणपटू), हबीबुल्लो राजाबोव्ह (विदेशी नागरिक - साहित्य, शिक्षण), एम. आर. राजगोपाल (वैद्यकीय), संपत रामटेके (समाजसेवा, मरणोत्तर), चंद्रशेखर रथ (साहित्य व शिक्षण), एस. एस. राठोड (नागरी सेवा), अमिताव रॉय (विज्ञान आणि अभियांत्रिकी), संदूक रुइत
(विदेशी नागरिक - वैद्यकीय), आर. सत्यनारायण (संगीत), पंकज एम. शहा (वैद्यकीय),भज्जू श्याम (चित्रकला), महाराव रघुवीरसिंग (साहित्य आणि शिक्षण), किदंबी श्रीकांत (बॅडमिंटन), इब्राहिम सुतार (संगीत), सिद्धेश्वर स्वामीजी (अध्यात्म), लेंटिना आओ थक्कर (समाजसेवा), विक्रमचंद्र ठाकूर (विज्ञान आणि अभियांत्रिकी), रुद्रपत्नम नारायणस्वामी तारनाथन व त्यागराजन (संगीत), न्यूएन तिएन थिएन (विदेशी नागरिक - अध्यात्म), भगिरथप्रसाद त्रिपाठी (साहित्य आणि शिक्षण), राजगोपालन वासुदेवन (विज्ञान आणि अभियांत्रिकी), मानसबिहारी वर्मा (विज्ञान आणि अभियांत्रिकी), गंगाधर पानतवणे (साहित्य),
रोमुलूस विटाकर (वन्यजीव संवर्धन), बाबा योगेंद्र (कला), ए. झाकिया (साहित्य आणि शिक्षण).

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: government announces padma awards, Padma Shri award to Dr Abhay and Rani Bang latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV