मनसेचं एक पत्र, सरकारने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं नाव बदललं!

कर्जतला दादा पाटील महाविद्यालयाच्या मैदानात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेसाठी चार मैदानं तयार करण्यात आली असून 24 महिला पुरुषांचे संघ सहभाग घेणार आहेत.

मनसेचं एक पत्र, सरकारने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं नाव बदललं!

अहमदनगर : मनसेच्या पत्र व्यवहारानंतर राज्यस्तरीय कबड्डी आणि व्हॉलीबॉल स्पर्धेच्या नावात सुधारणा करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आणि छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा, असं नामकरण करण्यात आलं आहे.

अहमदनगरला कर्जत तालुक्यात 27 डिसेंबरपासून एक जानेवारीपर्यंत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय कबड्डी या नावानं या स्पर्धा होणार होत्या. मात्र, स्पर्धेच्या नावात ‘छत्रपती शिवाजी’ असा एकेरी उल्लेख होता. या प्रकरणी मनसेचे दक्षिण जिल्हा प्रमुख सचिन पोटरे यांनी पत्र व्यवहार केला होता. एकेरी उल्लेख टाळून स्पर्धेच्या नावात ‘महाराज’ असा नामोल्लेख करण्याची मागणी केली होती.

Kabaddi

या संदर्भात पोटरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राम शिंदे आणि शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेंकडे पत्र व्यवहार केला होता. या संदर्भात सरकारने मंगळवारी सुधारीत अध्यादेश काढून सुधारणा केली. कबड्डी आणि व्हॉलीबॉल स्पर्धेच्या नावात सुधारणा करण्यात आली आहे.

कर्जतला दादा पाटील महाविद्यालयाच्या मैदानात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेसाठी चार मैदानं तयार करण्यात आली असून 24 महिला पुरुषांचे संघ सहभाग घेणार आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Government changes name of Kabaddi competition after MNS letter latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV