सरकार 31 मेपर्यंत आणखी एक लाख टन तूर खरेदी करणार

सरकार 31 मेपर्यंत आणखी एक लाख टन तूर खरेदी करणार

नवी दिल्ली : तूर उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळला आहे. केंद्र सरकारने 31 मेपर्यंत महाराष्ट्राला आणखी 1 लाख टन तूर खरेदी करण्याची परवानगी दिली आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

“महाराष्ट्राने 2 लाख टन तूर खरेदीची परवानगी केंद्राकडे मागितली होती. मात्र, महाराष्ट्राला सध्या एक लाख टन खरेदीची परवानगी दिली असून, उर्वरित एक लाख टना खरेदीची मागणीही तत्वत: मान्य केली आहे. त्यामुळे परिस्थिती पाहून आणखी एक लाख टन तूर खरेदीलाही परवानगी दिली जाईल, असे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे.”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाला दिली.

व्यापाऱ्यांवर नजर ठेवणार : मुख्यमंत्री

यंदा जवळपास सहा लाख टनाहून अधिक तूर खरेदी होईल आणि हा एक विक्रम असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिवाय, शेतकऱ्यांच्या नावाने व्यापारी तूर टाकणार असतील, तर त्यांच्यावर नजर ठेवली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांना दिला आहे.

आधी 22 एप्रिलपर्यंत तूर खरेदीची परवानगी होती. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर 31 मे पर्यंत तूर खरदी करण्याची परवानगी मिळाली आहे.

मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच महाराष्ट्रातील तूरप्रश्नावर केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीत महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

बारदाण्याचा प्रश्न कायम

एक लाख टन तूर खरेदीची परवानगी मिळाली असली, तरी बारदाणा उपलब्ध करुन देणार का, हा प्रश्न कायम आहे. कारण यापूर्वी बारदाण्याअभावी तूर खरेदी रखडली होती.

एबीपी माझाची तूर परिषद

दरम्यान, एबीपी माझाने महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्ना सातत्याने उचलून धरला आहे. यवतमाळमध्ये एबीपी माझाने तूर परिषद आयोजित करुन शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार दरबारी पोहोचवल्या होत्या.

बातमीचा व्हिडीओ –

First Published:

Related Stories

''मान्सून राज्यात वेगाने येणार, 2, 3 आणि 4 जूनला पावसाचा अंदाज''
''मान्सून राज्यात वेगाने येणार, 2, 3 आणि 4 जूनला पावसाचा अंदाज''

पुणे : राज्यात मान्सून वेगाने दाखल होईल. 2, 3 आणि 4 जून रोजी पावसाची

ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब
ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत...

नवी दिल्ली : दोन वर्षानंतर ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ झाली आहे. आज

एफआरपी म्हणजे काय?
एफआरपी म्हणजे काय?

मुंबई : सारखरेच्या दरासंदर्भात सर्रास कानावर पडणारा शब्द म्हणजे

तूर, मोसंबी, मिरचीनंतर आता हळदीच्या दरातही घसरण
तूर, मोसंबी, मिरचीनंतर आता हळदीच्या दरातही घसरण

सांगली : तूर, मोसंबी, मिरची आणि आता हळदीच्या उत्पादनात 20 ते 25 टक्के वाढ

खरीप हंगामासाठी 'महाबीज' 6 लाख क्विंटल बियाणं बाजारात आणणार
खरीप हंगामासाठी 'महाबीज' 6 लाख क्विंटल बियाणं बाजारात आणणार

अकोला : येत्या खरीप हंगामासाठी ‘महाराष्ट्र राज्य बियाणे

शेतकऱ्यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रेच्या तयारीत असलेला शेतकरी ताब्यात
शेतकऱ्यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रेच्या तयारीत असलेला शेतकरी...

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

शिवसेनेच्या मेळाव्यात अस्थी घेऊन शेतकरी मंचावर
शिवसेनेच्या मेळाव्यात अस्थी घेऊन शेतकरी मंचावर

नाशिक: नाशिकमध्ये सुरु असलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यातल्या एका

मोदींनी 'चाय पे चर्चा' केलेले दीडशे शेतकरी उपोषणासाठी दिल्लीत
मोदींनी 'चाय पे चर्चा' केलेले दीडशे शेतकरी उपोषणासाठी दिल्लीत

नवी दिल्ली : यवतमाळच्या ज्या दाभडी गावात तीन वर्षांपूर्वी

मान्सून 30 मे रोजी केरळात!
मान्सून 30 मे रोजी केरळात!

पुणे : मान्सून 30 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे. भारतीय हवामान

अल निनो न्यूट्रल, यंदा मान्सूनवर परिणाम नाही!
अल निनो न्यूट्रल, यंदा मान्सूनवर परिणाम नाही!

वॉशिंग्टन : भारतात यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहणार नाही,