माध्यान्ह भोजनासाठी शिक्षकांच्या खिशाला कात्री, सरकारचा अजब निर्णय

सरकारी शाळेतले शिक्षक काही दिवसांनी जर वाणसामानाच्या पिशव्या घेऊन बाजारात फिरताना दिसले तर आश्चर्य वाटू देऊ नका. कारण शिक्षणमंत्री विनोद तावडे साहेबांच्या कृपेने शिक्षकांना आता ही भूमिकाही पार पाडावी लागणार आहे.

Government’s unique decision on midday meal latest update

उस्मानाबाद : समजा, विधिमंडळातल्या आमदाराच्या कँटिनमधले दर किती असावेत यावर सरकार आणि ठेकेदार असा तोडगा निघाला नसता आणि आमदारांची कँटिन बंद ठेवण्याची वेळ आली असती तर सरकारनं आमदारांना तुम्ही पदरमोड करुन जेवा. त्यानंतर बिलं सादर करा, असं सांगितलं असतं का?  मुळीच नाही…पण शाळेतल्या माध्यान्ह भोजनासाठी शिक्षकांना तसे आदेशच दिले आहेत.

सरकारी शाळेतले शिक्षक काही दिवसांनी जर वाणसामानाच्या पिशव्या घेऊन बाजारात फिरताना दिसले तर आश्चर्य वाटू देऊ नका. कारण शिक्षणमंत्री विनोद तावडे साहेबांच्या कृपेने शिक्षकांना आता ही भूमिकाही पार पाडावी लागणार आहे.

त्याचं झालं असं की दुपारच्या खिचडीसाठी अंतिम करायच्या निविदा ऑगस्ट महिना उजाडला तरीही शिक्षण खात्यानं मंजूर केल्या नाहीत आणि त्या उलट शाळेतलं माध्यान्ह भोजनाचं सामान संपल्यावर गावकऱ्यांकडून पैसे जमवा किंवा शिक्षकांनी स्वत:च्या खिशातले पैसे घाला असा अजब आदेश सरकारनं बजावला आहे.

एकीकडे खिचडीसाठी लागणारं सगळं साहित्य आणि सोबतच पूरक आहार म्हणून खजूर, फळं यासाठी होणारा खर्च हा सगळा खर्च आता मुख्याध्यापकांच्या माथी मारण्यात आला आहे. त्यामुळे या भयानक कोंडीतून कसा मार्ग काढायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

शालेय पोषण आहाराचं राज्याचं बजेट आहे 1731 कोटी आहे. इतक्या मोठ्या रकमेचं टेंडर कुणाला द्यायचं यावर जानेवारीतच निर्णय अपेक्षित होता. मात्र सरकारनं आता शाळानांच अजब आदेश बजावल्यानं सरकार दिवाळखोरीत आहे का? हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

शिक्षक कुठलाही असला तरीही तो काही कुबेर कुळातला नक्कीच नाही. शिवाय शिकवण्या व्यतिरिक्त अन्य कामांचा ससेमिरा त्यांच्या पाचवीलाच पुजला गेला आहे. त्यामुळे स्वत:च्या घराचा डोलारा सांभाळायचा की विद्यार्थ्यांच्या खिचडीसाठी स्वत:च्या पगारातून वर्गण्या काढून वाणसामान खरेदी करत फिरायचं? असा सवाल शिक्षक संघटना विचारत आहेत.

VIDEO: 

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Government’s unique decision on midday meal latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

राज्यात येत्या तीन दिवसात मुसळधार पाऊस, हवामानाचा अंदाज
राज्यात येत्या तीन दिवसात मुसळधार पाऊस, हवामानाचा अंदाज

मुंबई: येत्या तीनदिवसात  राज्यात मुसळधार पावसाची एण्ट्री होईल, असा

मराठा लाईट इन्फंट्री सेंटरमध्ये जवानांनी फोडली दहीहंडी!
मराठा लाईट इन्फंट्री सेंटरमध्ये जवानांनी फोडली दहीहंडी!

बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये गोकुळ

पालघरमध्ये 21 वर्षीय गोविंदाचा थरावरुन पडून जागीच मृत्यू
पालघरमध्ये 21 वर्षीय गोविंदाचा थरावरुन पडून जागीच मृत्यू

पालघर : पालघरमध्ये दहीहंडीच्या थरावरुन पडून 21 वर्षीय गोविंदाचा

नगरमधील विखे पाटील संकुलात 150 फूट उंच ध्वज
नगरमधील विखे पाटील संकुलात 150 फूट उंच ध्वज

अहदमनगर : अहमदनगरला विळद घाटात विखे पाटील शैक्षणिक संकुलात 150 फूट

बारामतीत गणवेशासाठी विद्यार्थ्यांचं ‘बोंबाबोंब’ आंदोलन
बारामतीत गणवेशासाठी विद्यार्थ्यांचं ‘बोंबाबोंब’ आंदोलन

बारामती : गेल्या दोन वर्षांपासून शालेय गणवेश दिले नसल्याने

ठाणे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकरांची मृत्यूशी झुंज अपयशी
ठाणे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकरांची...

औरंगाबाद : ठाणे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर

'सुकाणू'च्या कार्यकर्त्यांची धरपकड, बीडमध्ये ध्वजारोहणाला पंकजा मुंडेंची दांडी
'सुकाणू'च्या कार्यकर्त्यांची धरपकड, बीडमध्ये ध्वजारोहणाला पंकजा...

मुंबई: सरसकट कर्जमाफीसाठी सुकाणू समितीने आंदोलन छेडलं आहे. संपूर्ण

बहुचर्चित सपना पळसकर नरबळी प्रकरणी सात जणांना फाशी
बहुचर्चित सपना पळसकर नरबळी प्रकरणी सात जणांना फाशी

यवतमाळ : यवतमाळमधील बहुचर्चित सपना पळसकर नरबळी प्रकरणी जिल्हा सत्र

भाजपसह राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत, दानवे-मेहता रडारवर
भाजपसह राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत, दानवे-मेहता रडारवर

मुंबई/नवी दिल्ली : गोपाळकाला अर्थात दहीहंडीच्या पूर्वसंध्येला

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 14/08/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 14/08/2017

  शहीद सुमेध गवईंवर अकोल्यातील लोणाग्रात अंत्यसंस्कार,