डबघाईला आलेल्या जिल्हा बँकांच्या विलिनीकरणासाठी हालचाली सुरु

यासाठी नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

डबघाईला आलेल्या जिल्हा बँकांच्या विलिनीकरणासाठी हालचाली सुरु

मुंबई : राज्यातील डबघाईला आलेल्या जिल्हा बँकांचं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करण्यासाठी सरकारने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

राज्य सरकारने नियुक्त केलेली ही समिती अभ्यास करुन अहवाल सादर करणार आहे. सरकारकडून याबाबत अध्यादेश जारी करण्यात आला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना जिल्हा बँकांच्या माध्यमातून पीक कर्ज पुरवठा केला जातो. जवळपास 60 टक्के शेतकरी जिल्हा बँकांवर अवलंबून आहेत. मात्र राज्यातील 31 जिल्हा बँकांपैकी काही बँका पीक कर्ज पुरवण्यासाठी सक्षम नाहीत. त्यामुळे ठेवीदार आणि ग्राहकांचं हित लक्षात घेता या बँकांचं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करण्याची गरज असल्याचं सरकारने म्हटलं आहे.

अभ्यासासाठी आठ सदस्यीय समिती

  •  समितीचे अध्यक्ष, यशवंत थोरात, नाबार्डचे माजी अध्यक्ष

  • विजय झाडे, सहकार आयुक्त आणि निंबधक, पुणे

  • राजेंद्र एन. कुलकर्णी, मुख्य महाव्यवस्थापक, नाबार्ड, पुणे

  • विद्याधर अनासकर, चेअरमन, महाराष्ट्र अर्बन को. ऑ. बँक फेडरेशन

  • मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

  • दिनेश ओऊळकर, सेवानिवृत्त अप्पर सचिव

  • डी. ए. चौगुले, सनदी लेखापाल

  • समितीचे सदस्य सचिव, अप्पर आयुक्त आणि विशेष निबंधक, मुख्यालय, पुणे

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: govt appointed 8 members committee to study on merger of district banks
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV