सोलापुरात पुन्हा एकदा ‘ग्रीन कॉरिडॉर’

सोलापूरकरांनी आज ग्रीन कॉरिडॉरचा अनुभव घेतला. गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा सोलापूरकरांनी दातृत्वाच दर्शन घेतलं.

सोलापुरात पुन्हा एकदा ‘ग्रीन कॉरिडॉर’

सोलापूर : सोलापूरहून पुण्यात अवयव नेण्यासाठी सोलापुरात ‘ग्रीन कॉरिडॉर’ करण्यात आला. पोलिसांनी मोठ्या कुशलतेने अवयवदान प्रक्रियेसाठी जाणाऱ्या वाहनांना मार्ग मोकळा करुन दिला.

अवयवदानासंदर्भात आता जनमानसात सकारात्मक पाऊल उचलली जात आहेत. मेंदू मृत झालेल्या व्यक्तीचे अवयव गरजूंना दान करण्याची मानसिकता रुढ होते आहे. असाच दिलदारपणा आज सोलापुरातल्या एका कुटुंबाने दाखवला. मेंदू मृत झालेल्या एका महिलेचे अवयव आज पुण्याला पाठवण्यात आले. त्यासाठी सोलापुरात आज ग्रीन कॉरीडॉर करण्यात आला होता.

सोलापूरकरांनी आज ग्रीन कॉरिडॉरचा अनुभव घेतला. गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा सोलापूरकरांनी दातृत्वाच दर्शन घेतलं.

सोलापुरातल्या यशोधरा हॉस्पिटलमधून पुण्याला अवयव नेण्यासाठी आज सकाळीच ग्रीन कॉरिडॉरची तयारी झाली होती. पोलिसांनी मोठ्या कुशलतेने अवयवदान प्रक्रियेसाठी जाणाऱ्या वाहनांना मार्ग मोकळा करून दिला.

मोहोळ तालुक्यातील हिवरे गावातल्या कविता डिकरे या महिलेवर 6 ऑक्टोबर रोजी शेतात काम करताना वीज कोसळली होती. त्यांना उपचारासाठी यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारातून सुधारणा तर झाली नाहीच, उलट परिस्थिती बिकट बनत गेली. काल संध्याकाळी मेंदू मृत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. कुटुंबियांना अवयवदानासंदर्भात समुपदेशन करण्यात आलं. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या डिकरे कुटुंबीयांनी मानाचा मोठेपणा दाखवत अखेर अवयवदानाला संमती दर्शवली.

शासकीय सोपस्कार पूर्ण करून आज सकाळी कविता यांच्यावर शस्त्रक्रिया सुरु झाली. लिव्हर, किडनी, डोळे आणि ह्रदय गरजूंना देण्यासाठी शासकीय प्रक्रिया पूर्ण केली गेली. पुण्यातल्या रुग्णाला लिव्हर पाठवण्यात आलं, तर दोन्ही किडन्या सोलापुरातल्या रुग्णालयात गरजू रुग्णांना देण्यात आल्या.

यशोधरा हॉस्पिटलचा कर्मचारी वर्ग, वैद्यकीय तज्ज्ञ आणि पोलीस प्रशासनाने अत्यंत कमी वेळात अवयव प्रत्यारोपण करण्यासाठीची प्रक्रिया मोठ्या कौशल्याने पार पाडली. संकट काळात उदार मनाने अवयवदानाचा निर्णय घेणाऱ्या डिकरे कुटुंबियाच कौतुक करावं तेवढ कमी. घरातली व्यक्ती देवाघरी गेली तरी तिच्या रूपाने तीन-चार व्यक्तींना जीवदान मिळालं. अवयवदानासंदर्भात होत असलेली ही जनजागृती समाजमनाला नवी दिशा देणारी ठरली.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV