गणेश मूर्तींवरील जीएसटी पूर्णपणे हटवला, सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

जीएसटीमध्ये केंद्र सरकारनं पुन्हा नवे बदल केले आहेत. गणेश मूर्तींसह हस्तकलेच्या 29 वस्तूंवरचा जीएसटी पूर्णपणे हटवण्यात आला आहे.

गणेश मूर्तींवरील जीएसटी पूर्णपणे हटवला, सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : जीएसटीमध्ये केंद्र सरकारनं पुन्हा नवे बदल केले आहेत. गणेश मूर्तींसह हस्तकलेच्या 29 वस्तूंवरचा जीएसटी पूर्णपणे हटवण्यात आला आहे. सुरुवातीपासूनच गणेश मूर्तींवरील जीएसटी हटवण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर आज (गुरुवार) झालेल्या जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

यासोबतच नाट्य रसिकांनाही दिलासा देण्यात आला आहे. 500 रुपयांच्या आतील नाटकांच्या तिकीटांवरचा जीएसटीही हटवण्यात आला आहे. जीएसटी परिषदेच्या 25 व्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.

याआधी ही सवलत फक्त 250 रुपयापर्यंतच्या तिकीटावरच होती. पण नाट्यकलावंतांच्या मागणीनुसार राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रात यासंबंधी बराच पाठपुरावा केला. त्यानंतर आजच्या बैठकीत 500 रुपयांच्या आतील नाटकांच्या तिकीटावरचा जीएसटी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान पेट्रोल-डिझेल तसंच सॅनिटरी नॅपकीनबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. येत्या 25 जानेवारीपासून जीएसटी नवे दर लागू होणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.

जीएसटी काऊन्सिलच्या आजच्या बैठकीत छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देत हॅण्डीक्राफ्टच्या 29 वस्तूंवरील कर पूर्णपणे माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याशिवाय जवळजवळ 49 इतर वस्तूंवरील कर कमी करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

तब्बल 49 वस्तूंवरील टॅक्समध्ये कपात, जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत निर्णय

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: GST completely removed from Ganesha murti latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV