नंदुरबारमध्ये तुफान पाऊस, भर उन्हाळ्यात नदीला पूर

सातपुडयात पडलेल्या या पावसामुळे ब्राम्हणपुरीमधल्या सुसरी नदीला अक्षरश: पूर आला.

नंदुरबारमध्ये तुफान पाऊस, भर उन्हाळ्यात नदीला पूर

नंदुरबार: भर उन्हाळ्यात मध्यप्रदेश आणि नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं, ब्राम्हणपुरीतील सुसरी नदीला पूर आला. गुरुवारी दुपारी 2 पर्यंत नंदुरबारमध्ये उन्हाच्या झळा बसत होत्या, मात्र 4 नंतर अक्कलकुवा आणि धडगावमध्ये अचानक पावसाच्या सरी बरसू लागल्या.

सातपुड्यात पाऊस

सातपुडयात पडलेल्या या पावसामुळे ब्राम्हणपुरीमधल्या सुसरी नदीला अक्षरश: पूर आला. तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील केळी, पपई, गहू, हरभरे या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. मात्र पाण्याची टंचाई असणाऱ्या भागात पाऊस झाल्यानं पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटली.

दुसरीकडे नंदुरबार शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर जिल्ह्यात अन्य भागात ढगाळ वातावरण होते.

दुपारी कडक उन, संध्याकाळी पाऊस

दुपारी दीड वाजेपर्यंत शहरासह जिल्हाभरात तापमान चाळीशीच्या वर असल्याने, अंगाची लाहीलाही होत होती. परंतु दोनच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला.

ढगाळ वातावरणाने नागरिकांना दिलासा दिला. त्यानंतर दुपारी 4 च्या सुमारास अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील दर्‍याखोर्‍यांसह काही भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे भर उन्हाळ्यात सुसरी नदीला अचानक पूर आला.पूर पाहण्यासाठी गर्दी

सातपुड्याच्या दर्‍या खोर्‍यातून वाहणार्‍या सुसरी नदीला भर उन्हाळ्यात पूर आल्याने ब्राम्हणपुरी येथील नागरिकांनी, पाणी पाहण्यासाठी नदीकाठी गर्दी केली.

ब्राम्हणपुरी परिसरात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक वादळी वारं सुरू झालं. त्याचबरोबर तुरळक  पावसाला सुरुवात झाली. उकाडयाने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने थोडाफार दिलासा दिला. परंतु शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले.

परिसरात गहू, हरभरे, कापून शेतात काढणीवर आलेले पीक, केळी, पपईला फटका बसला. मात्र दुसरीकडे पाणी प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: heavy rain in nandurbar, Susari river flooded
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV