सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, घरांचं मोठं नुकसान

घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे नागरिकांना अक्षरशः रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे.

सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, घरांचं मोठं नुकसान

सातारा : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने सातारा जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. तासवडे ते बेलवडे हवेली परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे नागरिकांना अक्षरशः रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे.

जवळपास 15 घरांवरील छप्पर उडाले आहेत. तर संसार उपयोगी साहित्य वाऱ्यामुळे घराच्या बाहेर आलं आहे. शिवाय महामार्गालगतच्या हॉटेलांचंही मोठं नुकसान झालं आहे. विविध ठिकाणी 20 ते 25 झाडं उन्मळून पडली आहेत.

मुंबईसह राज्यभरात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. नदी-नाले अगोदरच भरलेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरल्याच्या घटनाही घडत आहेत. नागरिकांनी या पावसात खबरदारी घेण्याची गरज आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: rain satara पाऊस सातारा
First Published:

Related Stories

LiveTV