राज्यात परतीच्या पावसाचा कहर, वीज पडून 11 जणांचा मृत्यू

अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडालीच, परंतु काहींना जीवही गमवावा लागला.

राज्यात परतीच्या पावसाचा कहर, वीज पडून 11 जणांचा मृत्यू

मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक भागात परतीच्या पावसाचा कहर पाहायला मिळाला. वीज पडून काल (शुकवार) दिवसभरात अकरा जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई उपनगरं, नवी मुंबई, रायगड, विदर्भाच्या काही भागात परतीच्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडालीच, परंतु काहींना जीवही गमवावा लागला.

सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. पालघरमध्ये वीज पडून चौघांचा मृत्यू झाला. धुळ्यात तीन महिला, जालन्यात एक आणि मुंबईत एकाचा वीज पडून बळी गेला.

याशिवाय अनेक ठिकाणी घरांवरची छप्पर उडाली, तर पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणं जनावरंही दगावली आहेत.

संबंधित बातम्या

मुंबईत विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस

पालघरमध्ये वीज पडून 3 जणांचा मृत्यू, 14 जखमी

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV