येत्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार, गोंदिया जिल्ह्यात पावसाचा कहर

महाराष्ट्रात मान्सूनने दमदार पुनरागमन केलं आहे. येत्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

By: | Last Updated: > Sunday, 16 July 2017 7:56 AM
heavy rainfall at Mumbai and konkan in upcoming 24 hours

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने दमदार पुनरागमन केलं आहे. येत्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारलेल्या मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यभरात विविध ठिकाणी पाऊस पडला असला तरी मराठवाडा मात्र अद्याप कोरडाच आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.

नाशिकच्या गंगापूर धरणातून विसर्ग सुरु करणार

नाशिक शहर आणि ग्रामीण भागाला पावसाने गेल्या दोन दिवसांपासून चांगलचं झोडपून काढलं आहे. दारणा, नांदूरमध्यमेश्वर धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सततच्या पावसामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 72 टक्के भरलं आहे. पावसाचा जोर कायम असल्याने आज सकाळी आठ वाजता गंगापूर धरणातून  2000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळं नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक : घोटी-सिन्नर महामार्ग पुढील एक महिन्यासाठी बंद

घोटी-सिन्नर महामार्ग पुढील एक महिन्यासाठी बंद राहणार आहे. मुसळधार पावसाने पुलावर मोठी भगदाडं पडली आहेत. त्याच्या दुरूस्तीसाठी महामार्गावरील दोन्ही दिशेची वाहतूक बंद राहणार आहे. स्थानिकांनी अनेकवेळा पुलाच्या दुरूस्तीसाठी प्रशासनाकडे विनंती केली होती. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आता ऐन पावसाळ्यात दुरूस्तीचं काम हाती घ्यावं लागलं आहे.  खरं तर मुंबईकडून शिर्डी, भंडारदाराला जाणाऱ्या भाविक आणि पर्यटकांची संख्या मोठी असते. मात्र पूल बंद करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

गोंदिया जिल्ह्यात पावसाचा कहर

विदर्भातील गोंदिया जिल्ह्याला पावसाने चांगलाचं झोडपलं आहे. किशोरी गावात अतिवृष्टी झाली असून या ठिकाणी तब्बल 260.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गाढवी नदीला पूर आल्याने किशोरी गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळं पाणी साचल्याने शेतीला तर अक्षरशः तलावाचं स्वरुप आलं. तर चिंचोली गावातील एक जण या पुरात वाहून गेला आहे. तर दोन जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

माळशेज घाट वीकेंडला वाहतुकीसाठी बंद

माळशेज घाट दोन दिवस (शनिवार-रविवार) वाहतुकीसाठी बंद असेल, अशी माहिती टोकावडे पोलिस निरीक्षक धनंजय मोरे यांनी दिली. कालसुद्धा हा माळशेज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

कल्याण आणि त्यापुढील भागात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतोय. त्यामुळे कोणत्याही क्षणी दरड पडण्याची शक्यता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

खबरदारी म्हणून पर्यटकांनी माळशेज घाटात जाणं टाळावं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. शनिवारी आणि रविवारी घाटात सहलीसाठी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी दिली.

जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत वाढ

नाशिकमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी यायला सुरुवात झाली आहे. नाशिकच्या दारणा आणि नांदूरमधून सोडलेले पाणी जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पोहचलं. जवळपास 1 टक्क्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या मराठवाड्यात पाऊस नसल्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस खाली जातोय. त्यामुळे या पाण्याने दिलासा मिळणार आहे. सध्या 23 हजार 378 क्युसेक इतक्या वेगाने जायकवाडी धरणात आवक सुरु आहे. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 18 टक्के इतका पाणीसाठा धरणात झाला आहे.

 

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:heavy rainfall at Mumbai and konkan in upcoming 24 hours
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून 700 अपघातग्रस्तांना जीवदान
व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून 700 अपघातग्रस्तांना जीवदान

रायगड : बहुतांश व्हॉट्सअॅप ग्रुपवर मित्र-मैत्रिणींच्या गप्पा,

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून औरंगाबादेतील दोघांचा मृत्यू
उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून औरंगाबादेतील दोघांचा मृत्यू

औरंगाबाद : बद्रीनाथहून ऋषिकेशला येत असताना महाराष्ट्रातील

छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र : आव्हाड
छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र : आव्हाड

मुंबई : साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयन राजे यांना

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/07/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/07/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/07/2017   मान्सून जुलैअखेर 10

मुंबई-गोवा हायवेवर खड्डेच खड्डे, लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात
मुंबई-गोवा हायवेवर खड्डेच खड्डे, लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात

रायगड : हो असा… आपलो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17.. हयसर खड्डे शोधूक

मान्सून जुलैअखेर 10 दिवसांसाठी ब्रेक घेणार
मान्सून जुलैअखेर 10 दिवसांसाठी ब्रेक घेणार

मुंबई: सध्या सर्वदूर पाऊस कोसळत असला, तरी लवकरच तो ब्रेक घेण्याचा

राष्ट्रपती निवडणुकीत नगरमधील 2 आमदार फुटले : सत्यजीत तांबे
राष्ट्रपती निवडणुकीत नगरमधील 2 आमदार फुटले : सत्यजीत तांबे

मुंबई: राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी

कोल्हापुरात पुरात अडकलेल्या अडीचशे प्रवाशांची सुटका
कोल्हापुरात पुरात अडकलेल्या अडीचशे प्रवाशांची सुटका

कोल्हापूर: कोल्हापुरातल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या 5 खासगी

बारामतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या
बारामतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

पुणे : बारामतीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका

'काऊ बॉय ऑफ सोलापूर, आयुष्यभर घोड्यावरुन प्रवास करणारा अवलिया
'काऊ बॉय ऑफ सोलापूर, आयुष्यभर घोड्यावरुन प्रवास करणारा अवलिया

सोलापूर:  काऊ बॉय ऑफ सोलापूर..अर्जुन कदम.. वय… फक्त 90.. कदमांच्या