ज्वारीच्या दाण्याएवढ्या इयरफोन कानात, लिपिक परीक्षेत हायटेक कॉपी

या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार अर्जुन घुसिंगे याला पकडण्यासाठी पोलिसांनी औरंगाबादमध्ये सापळाही रचला होता. पण याची कुणकुण लागताच तो तिथून निसटला.

hi tech copy in the clerk examination in Aurangabad four arrested latest update

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये झालेल्या महावितरणच्या लिपिक भरतीत कॉपी करण्याचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे. इथं परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका मुन्नाभाईनं कॉपी करण्यासाठी चक्क ज्वारीच्या दाण्याइतका इयरफोन वापरला.

विशेष म्हणजे या मुन्नाभाईला पास करण्यासाठी इतर तिघं जण फोनवर मदत करत होते. गिरजाराम जघाळे असं कॉपी करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. तर निलेश जोनवाल, पवन बहुरे आणि दत्ता नलावडे हे इतर तरुण त्याला पेपर सोडवण्यासाठी फोनवरुन मदत करत होते.

 

earphone 1-

वर्गावरील पर्यवेक्षकाला संशय आल्यानंतर त्यानं गिरजारामला पकडलं. यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. गिरिजारामच्या माहितीवरुन औरंगाबादच्या सिडको परिसरात छापा मारण्यात आला. इथून ३ आरोपींसह ६ मोबाईल, २ लॅपटॉप, स्पाय डिव्हायसेस, पुस्तक, प्रश्नपत्रिका जप्त केल्या आहेत. शिवाय या टोळीकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही मिळाल्याचं कळतं आहे.

या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार अर्जुन घुसिंगे याला पकडण्यासाठी पोलिसांनी औरंगाबादमध्ये सापळाही रचला होता. पण याची कुणकुण लागताच तो तिथून निसटला. तो फरार झाला असून सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

aurangabad earphone 2

 

 

असं सुरु होतं रॅकेट  :

– महावितरणच्या संकेतस्थळावरून उमेदवारांची यादी मिळवून ही टोळी उमेदवारांशी संपर्क साधायची.

– परीक्षा देण्यापूर्वी १ लाख व नोकरीवर रुजू झाल्यानंतर ७ लाख द्या, असे उमेदवारांना सांगितले जाई.

– टोळीचा मास्टरमाइंड अर्जुन घुसिंगे याने शहरातील काही उमेदवारांची माहिती मिळवून संपर्क साधला.

– प्रश्नपत्रिका कशी सोडवायची याचे प्रात्यक्षिक त्याने जयभवानी नगरातील एका उमेदवाराला करुन दाखवले.

– एका डिव्हाइसवरुन प्रश्नपत्रिकेचा फोटो काढला जात असे. ते डिव्हाइस परीक्षार्थीच्या जवळ लपवले जात असे. त्यानंतर त्याच्या कानात ज्वारीच्या दाण्याइतका इयरफोन असे. ज्यामध्ये त्याला उत्तरं सांगितली जात होती.

असा व्हायचा सौदा

फरार आरोपी अर्जुन घुसिंगे परीक्षार्थींकडून प्रत्येकी ८ लाख रुपयांत नोकरी लावण्याचा सौदा करत असे. परीक्षेपूर्वी तो १ लाख अॅडव्हान्स घेत असे. सोबत उमेदवारास सूक्ष्म इयरफोन दिला जायचा. उमेदवाराच्या कागदपत्रांची छायांकित प्रतही तो आपल्याकडे ठेवत असे. पास झाल्यानंतर तो पूर्ण रक्कम घेऊन कागदपत्रे परत देणार होता.

 

VIDEO :

 

 

 

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:hi tech copy in the clerk examination in Aurangabad four arrested latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

राहुल भड एवढेच अमरावती पोलीसही प्रतीक्षाच्या मृत्यूला जबाबदार
राहुल भड एवढेच अमरावती पोलीसही प्रतीक्षाच्या मृत्यूला जबाबदार

अमरावती : अमरावतीच्या वृंदावन कॉलनीतील ओंकार मंदिराजवळ प्रतीक्षा

औरंगाबाद जिल्ह्यात अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश
औरंगाबाद जिल्ह्यात अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश

औरंगाबाद : अवैध गर्भपात केंद्राचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

नितीन आगेला न्याय मिळवून देण्यासाठी हायकोर्टात जाणार : आठवले
नितीन आगेला न्याय मिळवून देण्यासाठी हायकोर्टात जाणार : आठवले

नवी दिल्ली/अहमदनगर : पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सुन्न

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/11/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/11/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/11/2017* 1. शिवसेना नेते आणि राज्यमंत्री

कलम 45 घटनाबाह्य, छगन भुजबळांना दिलासा मिळणार?
कलम 45 घटनाबाह्य, छगन भुजबळांना दिलासा मिळणार?

मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते

गरज पडल्यास सत्तेला लाथ मारेन : उद्धव ठाकरे
गरज पडल्यास सत्तेला लाथ मारेन : उद्धव ठाकरे

कोल्हापूर : शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही. गरज पडली तर सत्तेला

राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!
राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बांधकाम व्यावसायिक डी एस

मनसेचं एक पत्र, सरकारने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं नाव बदललं!
मनसेचं एक पत्र, सरकारने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं नाव बदललं!

अहमदनगर : मनसेच्या पत्र व्यवहारानंतर राज्यस्तरीय कबड्डी आणि

कोपर्डी निकाल : दोषी जितेंद्र शिंदेच्या वकिलांना धमकी
कोपर्डी निकाल : दोषी जितेंद्र शिंदेच्या वकिलांना धमकी

अहमदनगर : संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या

तांत्रिक मुद्द्यावरुन आमदारकी रद्द: अर्जुन खोतकर
तांत्रिक मुद्द्यावरुन आमदारकी रद्द: अर्जुन खोतकर

औरंगाबाद: मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने तांत्रिक