बारावीचा पेपर फुटला, तासाभरातच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तांबेवाडीच्या आश्रमशाळेत ही प्रश्नपत्रिका आढळून आली.

बारावीचा पेपर फुटला, तासाभरातच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर

सोलापूर : बारावीची परीक्षा सुरु झाल्यानंतर जेमतेम तासाभरातच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तांबेवाडीच्या आश्रमशाळेत ही प्रश्नपत्रिका आढळून आली.

मात्र प्रश्नपत्रिका कुठून लीक झाली याची अद्याप माहिती नाही.

paper hsc collage

तांबेवाडीच्या आश्रमशाळेत काही जणांच्या मोबाईलमध्ये ही प्रश्नपत्रिका आढळून आली. पण पेपर फुटला असला तरी ही प्रश्नपत्रिका परीक्षा हॉलमधून बाहेर कशी आली, याचा खुलासा झालेला नाही.

सेक्शन ए, बी आणि सी या प्रश्नपत्रिका लीक झाल्या आहेत. दरम्यान, कॉपीमुक्त परीक्षेसाठी राज्यभरात 252 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण पहिल्याच दिवशी इंग्रजीची प्रश्नपत्रिका थेट सोशल मीडियावर आली आहे.

इंग्रजीचा पेपर सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे नातेवाईक कॉपी टाकताना दिसून आलं. शाळेच्या जवळच काही दुकानं उभारण्यात आलेली आहेत. तिथे बसून गाईडमध्ये पाहून उत्तरं लिहिली जात आहेत. ही उत्तरं थेट विद्यार्थ्यांना पुरवली जात असल्याचं समोर आलं.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: HSC English paper leaked goes viral on social media
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV