मी मुख्यमंत्र्यांचा सर्वात लाडका मंत्री : संभाजी पाटील निलंगेकर

मुख्यमंत्र्यांनी फेव्हरेट आणि नॉन फेव्हरेट अशा मंत्र्यांची यादी तयार केली आहे का, असा सवाल निलंगेकरांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी नांदेड महापालिकेची टाकलेली जबाबदारी आपण योग्य पद्धतीने पार पाडू, असंही निलंगेकर म्हणाले.

मी मुख्यमंत्र्यांचा सर्वात लाडका मंत्री : संभाजी पाटील निलंगेकर

नांदेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात लाडका मंत्री कोणी असेल तर संभाजी पाटील निलंगेकरांचं नाव घेतलं जात, असं स्वतः निलंगेकर यांनी म्हटलं आहे. नांदेडमध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी फेव्हरेट आणि नॉन फेव्हरेट अशा मंत्र्यांची यादी तयार केली आहे का, असा सवाल निलंगेकरांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी नांदेड महापालिकेची टाकलेली जबाबदारी आपण योग्य पद्धतीने पार पाडू, असंही निलंगेकर म्हणाले.

अशोक चव्हाणांवर टीका करताना निलंगेकरांची जीभ घसरली

सभेत भाजप मंत्र्यांकडून आक्षेपार्ह वक्तव्य हे नेहमीचंच झालं आहे का, असा प्रश्न निर्माण झाल आहे. दोन दिवसांपूर्वीच मंत्री बबनराव लोणीकर यांनी परभणीत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता संभाजी निलंगेकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा जाहीर भाषणात ‘रावण’ असा उल्लेख केला.

भाजपला मतदान करा, शिवसेना आमदाराचं जाहीर आवाहन

राज्यात आणि केंद्रात शिवसेना-भाजप सत्तेत एकत्र आहे. एकत्र सत्तेत असूनही दोन्ही पक्षांची सतत एकमेकांवर कुरघोड्या सुरु असतात. पण शिवसेनेच्या विद्यमान आमदाराने जाहीर सभेत भाजपला मतदान करून विजयी करण्याचं आवाहन केलं आहे.

सध्या नांदेड महापालिकेच्या निवडणुकीची लगबग सुरू आहे. त्यानिमित्ताने कामगारमंत्री संभाजी निलंगेकर हे आज नांदेडच्या सभेत भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. या व्यासपीठावर शिवसेनेचे लोहा विधानसभेचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे देखील उपस्थित होते.

प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेनेतील अनेक आजी-माजी नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश केला आहे. याची जाहीर माहिती त्यांनी व्यासपीठावरुन दिली. शिवाय नांदेड महापालिकेत कोणत्याही परिस्थिती भाजपचाच महापौर झाला पाहिजे, असंही आवाहन त्यांनी केलं.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV