VIDEO : मला शिवसेनेकडूनही ऑफर, पण मी जाणार नाही : राणे

‘मला शिवसेनेकडूनही ऑफर आली होती, पण मी जाणार नाही.’ असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला.

VIDEO : मला शिवसेनेकडूनही ऑफर, पण मी जाणार नाही : राणे

कुडाळ : ‘मला शिवसेनेकडूनही ऑफर आली होती, पण मी जाणार नाही.’ असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला.

‘21 सप्टेंबरच्या शुभ मुहूर्तावर आपण आपली पुढची दिशा काय असेल हे सांगू.’ असं राणे यावेळी म्हणाले.

‘मला शिवसेनेकडूनही ऑफर होती’

‘मला शिवसेनेकडून ऑफर होती. त्यांच्यातील काही जणांनी मला सांगितलं की, तुम्ही अमुकांना भेटा, भेटायची इच्छा आहे. पण मी सुरुवातीलाच त्या गोष्टीला नकार दिला. मी स्पष्ट शब्दात  सांगितलं की, मला शिवसेनेत यायचं नाही.’ असं राणे यावेळी म्हणाले.

narayan rane 1902

‘मला शिवसेना कधीच अडवू शकत नाही’

याचवेळी राणेंनी शिवसेनेवरही जोरदार टीका केली. ‘समजा, मी कोणत्याही पक्षात प्रवेश करत असेल किंवा नसेल तरीही शिवसेना माझी अडवणूक करु शकत नाही. शिवसेनेचा एकही नेता मला अडवू शकत नाही. तेवढी हिंमत त्यांच्यात नाही.’ असं म्हणत राणेंनी त्यांना शिवसेनेला डिवचलं.

‘उद्धव ठाकरेंची ही अगदी सुरुवातीपासूनची वृत्ती आहे’

‘शिवसेना गेल्या तीन वर्षापासून काय करते आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. सत्तेत राहून सत्तेचा उपभोग घ्यायचा आणि दुसरीकडे त्याला विरोधही करायचा. हे सतत तीन वर्ष सुरु आहे. उद्धव ठाकरेंची ही अगदी सुरुवातीपासूनची वृत्ती आहे.’ असं म्हणत राणेंनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

‘मी आजही काँग्रेसमध्येच आहे’

दरम्यान, यावेळी बोलताना राणेंनी काँग्रेसच्या नेत्यावर टीका केली. ‘मी आजही काँग्रेसमध्येच आहे. पण जर काँग्रेसमध्ये लोकांची कामं होत नसतील तर मी टीका करणारच. सिंधुदुर्गात  सत्ता असताना अचानक कार्यकारिणी बरखास्त का केली? नांदेडमध्ये तर 17 नगरसेवक सोडून गेले. मग तिथं का नाही अशी कारवाई केली?’ असा सवालही राणेंनी यावेळी उपस्थित केला.

‘निर्णय अन्यायकारक असेल तर विरोध करणारच ‘

‘निर्णय अन्यायकारक असेल तर त्याला मी विरोध करणारच मग तो पक्ष श्रेष्ठींचा का असेना. कारण, अन्यायाला विरोध करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.’ असं म्हणत राणेंनी काँग्रेसविरुद्ध एल्गार पुकारला.

‘माझ्या दोन्ही मुलांना कोणीही नाकारण्याचा प्रश्नच नाही’

तुम्हाला घेण्यासाठी भाजप उत्सुक आहे पण तुमच्या दोन्ही पुत्रांना घेण्यास भाजपमधील काही नेत्यांचा विरोध आहे. या प्रश्नाला उत्तर देताना राणे म्हणाले की, ‘माझे दोन्ही पुत्र हे व्यवस्थित शिकले-सवरलेले आहेत. एक पीचडी आहे आणि दुसऱ्यानं एमबीए पूर्ण केलं आहे. तसंच एक आधी खासदार होता आणि दुसरा आता आमदार आहे. त्यामुळे दोघंही लोकांची कामं करत आहेत. त्यामुळे त्यांना कोणीही नाकारण्याचा संबंधच येत नाही.’ असं राणे यावेळी म्हणाले.

दरम्यान, नारायण राणे नेमकी काय चाल खेळणार हे येत्या 21 सप्टेंबरलाच समजू शकेल.

VIDEO : संबंधित बातम्या :

राणेंचं शक्तीप्रदर्शन पण कट्टर समर्थक कोळंबकर गैरहजर!

‘विरोधी पक्षनेते फिक्सिंग करतात’, नितेश राणेंचा विखे-पाटलांवर आरोप

…तोपर्यंत दाढी काढणार नाही : निलेश राणे

राणेंच्या ऐतिहासिक घोषणेला घटस्थापनेचा मुहूर्त!

राणेंचे कुरघोडीचे सर्व आरोप काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी फेटाळले

दसऱ्याआधी सीमोल्लंघन करणार : नारायण राणे

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV