बाबरी पाडायला गेले होते, आता राम मंदिर बांधायला जाणार : साध्वी प्रज्ञा सिंह

त्या औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

बाबरी पाडायला गेले होते, आता राम मंदिर बांधायला जाणार : साध्वी प्रज्ञा सिंह

औरंगाबाद : मी बाबरी पडायला गेले होते आणि लवकरच राम मंदिर बांधायला जाणार आहे, असं वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलं आहे. त्या औरंगाबादमध्ये  पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

सध्या देशात चांगलं काम सुरु असल्याचाही दावा साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केला. शिवाय, मला देश जे काम करायला लावेल ते मी करेन. देश हितासाठी काहीही करायची तयारी  आहे, असं म्हणत त्यांनी राजकारणात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले.

आपण दुर्लक्षित नसल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेसने षडयंत्र रचलं आणि तुरुंगात टाकल्याचा आरोप त्यांनी केला. साध्वी प्रज्ञा या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी होत्या. त्याप्रकरणी त्यांनी काही वर्ष तुरुंगवासही भोगला. मात्र हे काँग्रेसचं षडयंत्र होतं, असा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: i was
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV