सुनील केंद्रेकरांची मराठवाड्यातली बदली रद्द, भाजपच्या बड्या नेत्याचा हात?

मराठवाड्याच्या विभागीय आयुक्तपदी पुरुषोत्तम भापकरच कायम राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सुनील केंद्रेकरांची मराठवाड्यातली बदली रद्द, भाजपच्या बड्या नेत्याचा हात?

औरंगाबाद/बीड : कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अशी ओळख असलेले आयएएस अधिकारी सुनील केंद्रेकर यांचं स्वागत करण्यासाठी मराठवाड्यातली जनता उत्सुक होती. मात्र 24 तासांच्या आतच त्यांची बदली रद्द करण्यात आली आहे. मराठवाड्याच्या विभागीय आयुक्तपदी पुरुषोत्तम भापकरच कायम राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मराठवाड्यातील भाजपच्या काही बड्या नेत्यांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने आपलं राजकीय वजन वापरुन ही बदली रोखल्याची जोरदार चर्चा आहे. राज्यातील बारा सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आले होते. मात्र केंद्रेकरांच्या बदलीचे आदेश रद्द करण्यात आल्याचं अप्पर मुख्य सचिवांकडून कळवण्यात आलं. त्यामुळे मराठवाड्याच्या विभागीय आयुक्तपदी आता पुरुषोत्तम भापकरच कायम राहतील.

kendrekar 1

विद्यमान विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची मुंबई येथे पशुसंवर्धन खात्याचे सचिव म्हणून बदली करण्यात आली होती. तर औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त म्हणून क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचे सचिव सुनील केंद्रेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.

kendrekar 2

राजकारण्यांना सुनील केंद्रेकरांची धास्ती?

सुनील केंद्रेकर यांची बीडचे जिल्हाधिकारी म्हणून कारकीर्द चांगलीच गाजली होती. मात्र तिथेही त्यांची बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीनंतर सामान्य जनता रस्त्यावर उतरली होती.

विक्रीकर सहआयुक्त असताना त्यांनी कर वसुली मोठ्या प्रमाणात वाढवली. औरंगाबादला सिडकोचे मुख्य प्रशासक आणि औरंगाबाद महापालिकेचे प्रभारी आयुक्त म्हणून काम करत असतांना काही महिन्यात त्यांनी येथील कारभार व्यवस्थित केला.

महापालिकेला शिस्त लागत असतानाच त्यांची राज्याचे कृषी आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. कृषी खात्याचा पदभार स्वीकारताच त्यांनी गावागावात जाऊन कृषी योजनांची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना लाभ मिळतो की नाही याची पाहणी करत कामचुकार अधिकाऱ्यांना धडकी भरवली होती. त्यानंतर त्यांची क्रीडा खात्याचे सचिव म्हणून बदली करण्यात आली.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: IAS officer sunil kendrekar’s transfer order to Aurangabad has been cancelled
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV