यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस, IMD ची गुड न्यूज!

यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस पडेल, असं भाकीत आयएमडीने वर्तवलं.

यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस, IMD ची गुड न्यूज!

नवी दिल्ली: स्कायमेटपाठोपाठ भारतीय हवामान विभाग अर्थात आयएमडीने बळीराजाला गुड न्यूज दिली आहे. यंदा सरासरी पाऊस राहील, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस पडेल, असं भाकीत आयएमडीने वर्तवलं.

भारतीय हवामान विभाग अर्थात आयएमडी यंदाच्या पावसाचा पहिला अंदाज वर्तवला. हवामान विभागाने पत्रकार परिषद घेऊन पाऊसमान कसा राहिल याबाबतची माहिती दिली.

गेल्या वर्षी आयएमडीने 96 मिलीमीटर पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे पाऊस 95 टक्के पडला.

स्कायमेटचा अंदाज काय?

यंदा देशभरात  समाधानकारक मान्सून राहील, असा पहिला अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. सध्याची परिस्थिती, समुद्राचं तापमान, वाऱ्याची गती यावरुन हा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या 100% पाऊस पडेल, असं स्कायमेटने म्हटलं आहे. महाराष्ट्रात तर उत्तम पाऊसमान असेल, असं स्कायमेटने नमूद केलं आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरात पाऊसमान सामान्य राहील.  इतकंच नाही तर मराठवाड्यातही यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. येत्या जून महिन्यात सर्वाधिक 111 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर ऑगस्टमध्ये तुलनेने कमी म्हणजेच 96 टक्के पाऊस पडेल.

विशेष म्हणजे दुष्काळाच्या परिस्थितीचा अंदाज शून्य टक्के म्हणजे काहीच नाही असा वर्तवण्यात आला आहे.

कोणत्या महिन्यात किती पाऊस? (स्कायमेटच्या अंदाजानुसार)

जूनमध्ये 111 टक्के पाऊस

जुलैमध्ये 97 टक्के पाऊस

ऑगस्ट 96 टक्के पाऊस

- सप्टेंबर 101 टक्के पाऊस

सरासरी पाऊस म्हणजे किती?

890 मिमी पाऊस सरासरी मानला जातो, त्याच्या 19 टक्के कमीअधिक पाऊस पडला तरी तो सरासरी इतका मानला जातो.

2017 मध्ये 100 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. 2016 मध्ये सरासरीच्या 106 टक्के म्हणजे सरासरीच्या जास्त पाऊस पडेल, असा IMD चा पहिला अंदाज होता.

2014 आणि 2015 ही दोन्ही वर्ष महाराष्ट्रासाठी टंचाईची/दुष्काळसदृश, मराठवाड्यात भीषण स्थिती होती. 2014 मध्ये सरासरीच्या 12 टक्के कमी म्हणजे 781.8, तर 2015 मध्ये सरासरीच्या 14 टक्के कमी म्हणजे 760.6 मिमी एवढा पाऊस पडला.

महाराष्ट्रातील पावसाच्या अंदाजाची तुलना : स्कायमेट आणि आयएमडी (आकडे मिलीमीटरमध्ये)संबंधित बातम्या

हवामान खात्याच्या मान्सून अंदाजाकडे बळीराजाचं लक्ष


यंदा चांगला पाऊस पडणार, स्कायमेटची गुड न्यूज!
भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: IMD issued its 1st official forecast for 2018, southwest monsoon rains
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV