राज्यभरात थंडीची चाहूल, नाशकात पारा 10 अंशावर

नाशिक आणि निफाडमध्ये तब्बल 10 अंश सेल्सियस तापमानांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सध्या थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे.

राज्यभरात थंडीची चाहूल, नाशकात पारा 10 अंशावर

मुंबई : राज्यात पारा हळूहळू खाली घसरत असून नाशिक आणि निफाडमध्ये तर तब्बल 10 अंश सेल्सियस तापमानांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सध्या थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. नाशिकसह मुंबई, पुण्यातही राज्यभर चांगलीच थंडी जाणवू लागली आहे.

वाढत्या थंडीमुळे आता स्वेटर, कानटोपीसारखे गरम कापडे कपाटातून बाहेर काढायची वेळ आली आहे. दरम्यान पुण्यात 11 अंश सेल्सियस तर नागपूर, अकोला आणि परभणीत सुमारे 12 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं आहे.

नाशकात गुलाबी थंडी

नाशिक शहरात आजचं तापमान 10.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या नाशिककर गुलाबी थंडी अनुभव आहेत. अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरलेलीही पाहायला मिळत आहे. दरम्यान, राज्यात पारा आणखी खाली जाईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: In Nashik the temperature is 10 degree Celsius latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV