जालन्यात स्टील कंपन्यांवर धाड, कोट्यवधीचा काळा पैसा सापडला

आयकर विभागाच्या तब्बल 200 कर्मचाऱ्यांनी ही धाड टाकली. 1 ते 4 नोव्हेंबर दरम्यान ही कारवाई झाली.

जालन्यात स्टील कंपन्यांवर धाड, कोट्यवधीचा काळा पैसा सापडला

जालना/औरंगाबाद:  जालन्यात आयकर विभागाने मोठी छापेमारी केली आहे. दोन स्टील कंपनीवर टाकलेल्या धाडीत तब्बल 60 कोटी रुपये सापडले आहेत. सर्व पैसा कर चुकवून जमा केल्याचं समोर आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे नाशिक आणि औरंगाबाद आयकर विभागाच्या तब्बल 200 कर्मचाऱ्यांनी ही धाड टाकली. 1 ते 4 नोव्हेंबर दरम्यान ही कारवाई झाली.

ज्या बड्या स्टील कंपन्यांवर धाड टाकण्यात आली आहे, त्यांचे पुणे, कोलकाता, इंदूरमधील नातेवाईक आयकर विभागाच्या रडारवर आहेत.

नोटाबंदीला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र नोटाबंदीच्या काळात अनेकांनी लपवलेला पैसा बाहेर काढला, पण त्याचा हिशेब देण्यात ते अपयशी ठरले. शिवाय आयकर विभागाकडेही मराठवाड्यातून अशा पद्धतीचा पैसा लपवल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यातल्या त्यात जालन्यातील स्टील कंपन्यांचे व्यवहार संशयाच्या घेऱ्यात होते.

त्यानुसार आयकर विभागाने दिवाळीनंतर धाडसत्र सुरु करत, दोन स्टील कंपन्यांवर छापेमारी केली. त्यामध्ये 60 कोटी रुपये काळा पैसा सापडला.

200 जणांची टीम

या धाडीसाठी तब्बल 200 जणांची टीम बनवण्यात आली. यासाठी जालनाऐवजी औरंगाबाद पोलिसांची मदत घेण्यात आली. या टीमपैकी एक टीम 1 नोव्हेंबरला थेट कंपनीत धडकली तर दुसरी उद्योजकांच्या घरी.

या धाडसत्रात आयकर अधिकाऱ्यांना कंपनीने कोट्यवधीची कर चुकवल्याचं समोर आलं.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: income tax Raid on Steel companies at Jalna, 60 crore black money seized
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV