मुंबईसह राज्यात अंड्यांच्या किंमतीत वाढ

आज (शुक्रवार) मार्केटमध्ये लेअर अंड्यांचे दर 75 रुपये डझन म्हणजेच एक अंडं 7 ते 8 रुपयांना मिळतं आहे.

मुंबईसह राज्यात अंड्यांच्या किंमतीत वाढ

मुंबई : हिवाळा आला कि लोकांचा कल आरोग्यवर्धक असलेल्या अंड्याकडे आपोआप वळतो. पण यावेळीच्या हिवाळ्यात भाज्यांप्रमाणे अंड्याचे भाव ही गगनाला भिडलेले आहेत.

आज (शुक्रवार) मार्केटमध्ये लेअर अंड्यांचे दर 75 रुपये डझन म्हणजेच एक अंडं 7 ते 8 रुपयांना मिळतं आहे. तर देशी अंड्यांचे भाव 120 रुपये डझन  झाले आहेत. म्हणजेच एका देशी अंड्याची किंमत जवळपास 11 रुपये इतकी झाली आहे.

तापमानाच्या घसरत्या पाऱ्यामुळे अंड्यांचे भाव येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Increase in egg prices in Mumbai with the state latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV