'टॉयलेट..'वरुन प्रेरणा, कोल्हापूरच्या तरुणांचं कौतुकास्पद पाऊल

By: | Last Updated: > Tuesday, 13 June 2017 6:29 PM
'टॉयलेट..'वरुन प्रेरणा, कोल्हापूरच्या तरुणांचं कौतुकास्पद पाऊल

कोल्हापूर : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्या आगामी ‘टॉयलेट- एक प्रेमकथा’ चित्रपटाच्या ट्रेलरवरुन प्रेरणा घेत त्याच्या चाहत्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. कोल्हापूरच्या दोन तरुणांनी गरजूंसाठी शौचालय बांधून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

कोल्हापुरातील सचिन पटेल आणि वीजेंद्र सिंह या दोघांनी पदरचे पैसे खर्च करुन बावडामधील गरजू राहुल माळीसाठी शौचालय बांधलं. पटेल याने सिमेंट, खडी, वाळूचा खर्च उचलला, तर वीजेंद्रने सॅनिटेशन, गवंडी कामगार, फरशी इत्यादीचा 20 हजार 250 रुपयांचा खर्च पेलला. 12 दिवसात शौचालय बांधण्याचं काम करण्यात आलं. अक्षयकुमारवरील प्रेमापोटी दोघांनी हे सत्कार्य केलं.

चाहत्यांच्या सामाजिक जाण दाखवल्याने अक्षयकुमारही काहीसा भारावला आहे. त्याने ट्वीट करुन दोघांचं कौतुक केलं आहे. तुमच्यासारखे चाहते असल्याचं अभिमान आहे, असं अक्षयकुमारने म्हटलं आहे. टॉयलेट एक प्रेमकथामध्ये अक्षयसोबत भूमी पेडणेकर असून सिनेमा 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

अक्षयकुमारच्या ‘टॉयलेट- एक प्रेमकथा’ या चित्रपटातून स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा देण्यात आला आहे. यातून प्रत्येक घरात शौचालय असण्याचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अक्षयचं कौतुक केलं होतं.

2011 च्या लोकसंख्या आकडेवारीनुसार भारतात फक्त 46.9 टक्के नागरिकांच्या घरी शौचालय आहे. 49.8 टक्के नागरिक उघड्यावर शौचाला जातात. उर्वरित 3.3 टक्के नागरिक सार्वजनिक टॉयलेटचा वापर करतात.

संबंधित बातम्या :

अक्षय कुमारच्या सिनेमाचं नाव ऐकून मोदींनाही हसू अनावर!

‘अक्षयच्या ‘टॉयलेट’च्या दिग्दर्शकाची जीभ कापा, 1 कोटी मिळवा’

First Published:

Related Stories

सांगलीत भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी
सांगलीत भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये...

सांगली : हरिपूर गावामध्ये भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या

कोल्हापुरातील राजाराम बंधारा पाण्याखाली, मात्र तरीही वाहतूक सुरु
कोल्हापुरातील राजाराम बंधारा पाण्याखाली, मात्र तरीही वाहतूक सुरु

कोल्हापूर: कोल्हापुरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. धरण

महालक्ष्मी एक्स्प्रेसऐवजी अंबाबाई एक्सप्रेस करा, शिवसेनेची मागणी
महालक्ष्मी एक्स्प्रेसऐवजी अंबाबाई एक्सप्रेस करा, शिवसेनेची मागणी

कोल्हापूर : महालक्ष्मी एक्स्प्रेसचं नाव बदलून ते अंबाबाई

माणगावमध्ये नदीपात्रात अडकलेल्या 50 पर्यटकांना वाचवण्यात यश
माणगावमध्ये नदीपात्रात अडकलेल्या 50 पर्यटकांना वाचवण्यात यश

माणगाव: रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील देवकुंडनजीकच्या

देशभरात रमजान ईदचा उत्साह, नमाजासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी
देशभरात रमजान ईदचा उत्साह, नमाजासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी

मुंबई : आज संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात ईदचा सण साजरा केला जात

दरोड्यासाठी निवृत्त सैनिकासह अख्खं कुटुंब संपवलं, दोघांना अटक
दरोड्यासाठी निवृत्त सैनिकासह अख्खं कुटुंब संपवलं, दोघांना अटक

अहमदनगर : अहमदनगरच्या शेवगावमध्ये निवृत्त सैनिक आणि त्यांच्या

रक्ताचं नातं असून आम्हाला अश्रू ढाळायला बंदी होती : धनंजय मुंडे
रक्ताचं नातं असून आम्हाला अश्रू ढाळायला बंदी होती : धनंजय मुंडे

सोलापूर : नातं रक्ताचं असलं तरी अश्रू ढाळायला बंदी होती. 22

खडसेंचा एकच इशारा... प्रशासन खडबडून जागं!
खडसेंचा एकच इशारा... प्रशासन खडबडून जागं!

जळगाव : राज्याचे माजी महसूल मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे

संपूर्ण कर्जमाफी न केल्यास राज्यव्यापी आंदोलन : सुकाणू समिती
संपूर्ण कर्जमाफी न केल्यास राज्यव्यापी आंदोलन : सुकाणू समिती

मुंबई : सरसकट दीड लाखांच्या कर्जमाफीवर आक्षेप घेत सुकाणू समितीने

विठूमाऊलीचं आता 24 तास दर्शन घेता येणार
विठूमाऊलीचं आता 24 तास दर्शन घेता येणार

पंढरपूर : आषाढीच्या पार्श्वभूमीवर विठूरायाच्या दर्शनाची आस ठेवून