औरंगाबादमध्ये व्हाईटनरच्या नशेचा जीवघेणा विळखा

अवघ्या 10 ते 12 रुपयांमध्ये दुसऱ्याच जगात प्रवेश करणारी पोरं कोणत्याही गावातल्या सुनसान भागात आढळतात.

औरंगाबादमध्ये व्हाईटनरच्या नशेचा जीवघेणा विळखा

औरंगाबाद : औरंबादमधील तरुणाई सध्या अगदी स्वस्तात करता येणाऱ्या नशेच्या आहारी गेली आहे. अवघ्या 10 ते 12 रुपयांमध्ये दुसऱ्याच जगात प्रवेश करणारी पोरं कोणत्याही गावातल्या सुनसान भागात आढळतात.

त्यांना ट्रान्समध्ये घेऊन जाणारा हा नशा आहे... व्हाईटनरचा... याच व्हाईटनरला कायमचं पुसून टाकण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी मोहीम उघडली आहे.

कोणत्याही स्टेशनरी स्टोअर्समधून व्हाईटनर घेतलं जातं... त्याचे दोन थेंब रुमालात टाकले जातात... ते जोरात हुंगले... की मग या जगाशी संपर्कच तुटतो...

धक्कादायक गोष्ट ही, की औरंगाबाद शहरात ही नशा करणाऱ्यांचं वय हे आठव्या वर्षापासून सुरु होतं. फक्त व्हाईटनरच नाही... तर स्टिकफास्ट... नेलपॉलिश, पेट्रोल, डिझेल अशा पदार्थांचं व्यसन पोरांना जडलं आहे. पण हे ओळखायचं कसं? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

व्हाईटनरपासून सुरु झालेलं हे व्यसन... थेट ड्रग्ज आणि दारुपर्यंतही पोहोचू शकतं. शिवाय याचे शरिरावर होणारे परिणामही तितकेच घातक आहेत. त्यामुळे क्षणभराच्या सुखासाठी आयुष्य धोक्यात घालू नका...  व्हाईटनरची ही नशा...तुमचं आयुष्य पुसून टाकेल.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Intoxication
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV