भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करणारा अधिकारीच एसीबीच्या जाळ्यात

प्रभाकर बाबुराव पवार हा मंत्रालयात सहसचिव पदावर असला, तरी सध्या तो नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करणारा अधिकारीच एसीबीच्या जाळ्यात

धुळे : ‘कुंपणच शेत खातंय’ असं म्हणण्याची वेळ महाराष्ट्रातील प्रशासनावर आली आहे. कारण धुळ्यात भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी करणारा प्रभाकर बाबूराव पवार हा मंत्रालयतील सहसचिवच एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. लाच घेताना त्याला पकडण्यात आले असून, 11 मार्चपर्यंत पवारला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेल्या एका अधिकाऱ्याचा चौकशी अहवाल सरकारची दिशाभूल करणारा पाठवून, त्या बदल्यात त्या अधिकाऱ्याकडून 25 हजाराची रक्कम धुळ्यातील प्रशांत गवळी नामक व्यक्तीला देण्याचं मंत्रालयातील सहसचिव प्रभाकर बाबुराव पवार यांनी तक्रारकर्त्याला सांगितलं होतं.

एसीबीने सापळा लावून प्रभाकर पवारचा पंटर प्रशांत गवळी याला 25 हजार रुपये तक्रारकर्त्यांकडून स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. यानंतर धुळे येथील लाचलुपात प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी शत्रुघ्न माळी यांच्या पथकानं नाशिककडून नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडाकडे जाणाऱ्या प्रभाकर बाबुराव पवारला अटक करुन धुळ्यात आणलं.

मंत्रालयातील सहसचिव प्रभाकर बाबुराव पवार 1996 च्या राज्यसेवा बॅचचा असून, तो राजपत्रित अधिकारी आहे. सरकारने पवारची एसीबीने भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध लाच घेताना केलेल्या कार्यवाहीबाबत विभागीय चौकशीचे कामकाज करण्याकरता खास नियुक्त केले होते. मात्र पवारने चौकशी चालू असलेल्या अधिकाऱ्याकडे लाचेची मागणी करुन त्यांच्या बाजूने सरकारची दिशाभूल करणारे अहवाल सादर करण्याचा सपाटा लावला होता. सदर प्रकरणामुळे सर्व सरकारी वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी वर्गात या संदर्भात चर्चेला उधाण आले आहे.

प्रभाकर बाबुराव पवार हा मंत्रालयात सहसचिव पदावर असला, तरी सध्या तो नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी केलेल्या एकूणच सर्वच चौकशी प्रकरणांविषयी संशयाचं वातावरण असल्यानं त्या सर्व चौकशा पुन्हा नव्याने होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रभाकर बाबुराव पवारसह त्याचा पंटर प्रशांत गवळीला 11 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एसीबीने पवार याच्या ठाणेपाडा, कल्याण येथील मालमत्तांची चौकशी सुरु केली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Investigation Officer Prabhakar Pawar arrested in bribe case in Dhule
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV