कुठेही पळा, अटक करणारच : IG विश्वास नांगरे- पाटील

आरोपी पळून पळून कुठे पळतील?, कुठेही पळाले तरी त्यांना अटक करणारच, असा थेट इशारा विश्वास नांगरे पाटील यांनी दिला.

By: | Last Updated: > Wednesday, 11 October 2017 12:50 PM
IPS Vishwas nangre patils warns Udayanraje Bhosale & Shivendraraje Bhosale over Aanewadi toll plaza rada

सातारा: राष्ट्रावादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील हे पुन्हा आमने-सामने येण्याच्या तयारीत आहेत.

कारण गुरुवारी मध्यरात्री साताऱ्यात दोन्ही राजे अर्थात खा. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यात झालेल्या राड्याप्रकरणी, नांगरे-पाटील यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आनेवाडी टोलनाक्याच्या कंत्राटावरुन राडा झाला होता. याप्रकरणी पोलिसांकडून अटकसत्र सुरु आहे.

कुठेही पळा, अटक करणारच!

प्रत्येकाचा गुन्ह्यातील सहभाग पाहून कठोर कारवाई करु, मग तो कोणीही असो कायदा सर्वांना समान आहे, असं विश्वास नांगरे पाटील म्हणाले. इतकंच नाही तर या राड्यात सहभागी असणारे आरोपी पळून पळून कुठे पळतील?, कुठेही पळाले तरी त्यांना अटक करणारच, असा थेट इशारा नांगरे पाटील यांनी दिला.

पोलीसांचं कौतुक

यावेळी नांगरे पाटील यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचं आणि सातारा पोलिसांचं कौतुक केलं. “घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस दुपारपासून अलर्ट होते. एसपी संदीप पाटील हे वायरलेसवरुन सातत्याने पोलिसांच्या संपर्कात होते. पण मध्यरात्री असा प्रकार घडेल असा अंदाज नव्हता, पण तरीही पोलिसांनी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली” असं नांगरे पाटील म्हणाले.

13 जणांना अटक, अनेक जण रुग्णालयात

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनीही थर्ड पार्टी म्हणून गुन्हा दाखल केला आहे. घटनेदिवशी फायरिंग झालं असून दोन पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे, तर या राड्यात अनेक जण जखमी झाले आहेत. ते गुपचूपपणे उपचार घेत आहे. मात्र पोलीस त्यांचा शोध घेऊन, त्यांना अटक करतील, असंही नांगरे पाटील यांनी सांगितलं.

काय आहे आनेवाडी राडा प्रकरण?

आनेवाडी टोलनाक्यावरील वर्चस्व वादातून साताऱ्यातील दोन्ही राजे अर्थात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात गुरुवारी मध्यरात्री चांगलाच राडा झाला.

दोन्ही राजेंच्या समर्थकांमध्ये धुमश्चक्री होऊन, अनेक वाहनांची तोडफोड झाली. इतकंच नाही तर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्याजवळ गोळीबार झाल्यामुळे वाद चिघळला. खासदार उदयनराजे यांनी थेट शिवेंद्रराजे भोसलेंच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे आमदार शिवेंद्रराजे भोसले समर्थकांनी उदयनराजे समर्थकांच्या सात गाड्या फोडल्या.

संबंधित बातमी

शिवेंद्रराजेंच्या घरात घुसण्याचा उदयनराजेंचा प्रयत्न, मध्यरात्री राडा 

…तर उदयनराजेंना अटक करु: विश्वास नांगरे-पाटील

.. तर याद राखा, उदयनराजेंचा आणेवाडी टोल प्रशासनाला इशारा

पवारसाहेबांच्या तीन तिऱ्ऱ्या, आपला सत्ता..: उदयनराजे 

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:IPS Vishwas nangre patils warns Udayanraje Bhosale & Shivendraraje Bhosale over Aanewadi toll plaza rada
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

उद्धव ठाकरेंची मध्यस्थी, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता
उद्धव ठाकरेंची मध्यस्थी, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या

अहमदनगर:  या पेटीत मगर आहे
अहमदनगर: या पेटीत मगर आहे

अहमदनगर: शेवगाव तालुक्यात बारा फूट लांबीची मगर पकडण्यास यश आलं.

एसटी कर्मचाऱ्यांना विश्रामगृहातून अर्धनग्न अवस्थेत हाकललं
एसटी कर्मचाऱ्यांना विश्रामगृहातून अर्धनग्न अवस्थेत हाकललं

सोलापूर: पगारवाढीसाठी घरदार सोडून आंदोलन करणाऱ्या एसटी

एसटी कर्मचाऱ्यांबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका दुटप्पी : अशोक चव्हाण
एसटी कर्मचाऱ्यांबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका दुटप्पी : अशोक चव्हाण

नांदेड : ‘अंगणवाडी सेविकांचा प्रश्न जसा महत्वाचा आहे, तसाच एसटी

एसटी संप चौथ्या दिवशीही सुरुच
एसटी संप चौथ्या दिवशीही सुरुच

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सलग चौथा दिवस आहे. एसटी

धुळ्यात दोन फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, एकजण गंभीर जखमी
धुळ्यात दोन फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, एकजण गंभीर जखमी

धुळे : धुळ्यात फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागल्यानं दिवाळीच्या

आता तरी दिवे लावा, पांझरा कान साखर कारखान्यासाठी तरुणांचं आंदोलन
आता तरी दिवे लावा, पांझरा कान साखर कारखान्यासाठी तरुणांचं आंदोलन

साक्री (धुळे) : गेल्या 20 वर्षांपासून बंद असलेल्या ‘श्री पांझरा कान

उद्धव ठाकरेंचं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का? : इंटकचा सवाल
उद्धव ठाकरेंचं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का? :...

मुंबई : एसटी संपाचा आजचा तिसरा दिवस असून, कर्माचाऱ्यांच्या

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017

1. राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तीव्र, धुळ्यात अर्धनग्न

"एसटी कर्मचाऱ्यांना विश्रांतीगृहाबाहेर काढा आणि गुन्हे दाखल करा"

सोलापूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. अद्यापही