आता एका क्लिकवर पॅनसोबत आधार कार्ड लिंक करा!

आता एका क्लिकवर पॅनसोबत आधार कार्ड लिंक करा!

नवी दिल्ली : आधार कार्डशी पॅन लिंक करणं आता आणखी सोपं झालं आहे. आयकर विभागाने यासाठी ई-फायलिंग ही नवी ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे. एका स्टेपमध्ये तुमचं आधार कार्ड पॅनसोबत लिंक करता येईल.

सरकारने इनकम रिटर्न भरण्यासाठी पॅनसोबतच आधार कार्डही अनिवार्य केलं आहे. त्यामुळे करदात्यांना आधार कार्ड पॅनशी लिंक करण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून आयकर विभागाने आपल्या वेबसाईटवर ही नवी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

आधार कार्ड पॅनसोबत कसं लिंक कराल?

आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेलं नाव टाकावं लागेल.

pan link

वरील सर्व माहिती अचूक टाकल्यानंतर खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून 'लिंक आधार' या पर्यायावर क्लिक करावं लागेल. यानंतर लगेच तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक होईल.

दरम्यान आधार कार्ड आणि पॅनवर असणारी जन्म तारीख एक असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करावी लागेल.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV