जळगावात घराचं छत कोसळलं, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

घर कोसळल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरु केलं, पण त्यात त्यांना यश मिळालं नाही.

जळगावात घराचं छत कोसळलं, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

जळगाव : जळगावमध्ये मातीचं घर कोसळून चौघांचा मृत्यू झाला. पारोळा शहरातील काझी वाडामध्ये जीर्ण झालेल्या मातीच्या घरांचं छत आज पहाटे साडे पाचच्या सुमारास कोसळलं.

या दुर्घटनेत चादर व्यवसायिक असलेल्या काझी कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला, तर एकाला वाचवण्यात यश आलं आहे.

घर कोसळल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरु केलं, पण त्यात त्यांना यश मिळालं नाही.

सायराबी भिकन काझी (वय 50 वर्ष), आशिम भिकान काझी (वय 23 वर्ष), मोईन भिकन काझी (वय 18 वर्ष), शबिना भिकान काझी (वय 17 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV