भाऊबीजेला पणती लावताना भाजलेल्या चिमुरडीचा मृत्यू

पणती लावताना पल्लवी भाजून गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

भाऊबीजेला पणती लावताना भाजलेल्या चिमुरडीचा मृत्यू

जळगाव : जळगावात ऐन दिवाळीतच एक पणती विझली. पणती लावताना भाजून गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शनिवारी, भाऊबीजेच्या दिवशी पल्लवी चौधरी ही दहा वर्षांची बालिका पणती लावत होती. पणती लावताना पल्लवी भाजून गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

मात्र, उपचारांदरम्यान पल्लवीला वाचवण्यात यश आलं नाही. जळगावातल्या आव्हाने गावात ही घटना घडली. ऐन दिवाळीत झालेल्या या अपघातामुळे चौधरी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV