श्राद्धाला हास्याची कारंजी, मलारा कुटुंबाचा अनोखा पायंडा

मलारा कुटुंबानं त्यांच्या मित्रांना, आप्तेष्टांना हास्य क्लबचं निमंत्रण दिलं. यावेळी पोलीस अधीक्षकांसह, जिल्हाधिकारी आणि बरेच जळगावकर उपस्थित होते.

श्राद्धाला हास्याची कारंजी, मलारा कुटुंबाचा अनोखा पायंडा

जळगाव : जळगावच्या मेहरुण तलावाकाठी सकाळी-सकाळी हास्याची कारंजी फुलली होती.. निमित्त होतं श्राद्धाचं.. श्राद्ध असूनही हास्यविनोद रंगण्याचं कारण वेगळंच आहे.

सुंदरलाल मलारा यांचं गेल्या वर्षी निधन झालं. त्यांना रडणं मुळीच पसंत नव्हतं. वृद्धापकाळातही ते हास्य क्लब
चालवायचे. विज्ञानवादी असलेल्या सुंदरलाल यांचा पितर आणि कावळ्यांच्या शिवण्यावर विश्वास नव्हता.

सुंदरलाल यांना जाऊन वर्ष झालं. त्यामुळे आज मलारा कुटुंबानं त्यांच्या मित्रांना, आप्तेष्टांना हास्य क्लबचं निमंत्रण दिलं. यावेळी पोलीस अधीक्षकांसह, जिल्हाधिकारी आणि बरेच जळगावकर उपस्थित होते.

पितृपक्षात पितरांच्या मोक्षासाठी जखमी कावळ्याचा 'बाजार'


सुंदरलाल गेले, मात्र जळगावकरांसाठी ते हास्याची संपत्ती ठेऊन गेले. निसर्गावर प्रेम करण्याची जबाबदारी देऊन गेले. परवाच नाशकात एकानं कावळ्याचा बाजार मांडला होता. त्याच्यामागे जेवणाच्या पत्रावळ्या घेऊन लोकांची धावाधाव चालली होती. पितरांना मोक्ष मिळवण्यासाठी धडपड सुरु होती.

मलारा कुटुंबानं सुंदरलाल यांना खरा मोक्ष दिला. कारण त्यांनी लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं, आणि निसर्ग जपण्याचं आवाहनही केलं.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV