दारुने भरलेला ट्रक उलटला, मदत सोडून स्थानिकांचा दारुवर डल्ला

यावेळी स्थानिकांनी मदतकार्य सोडून ट्रकमधील दारुवर डल्ला मारला.

दारुने भरलेला ट्रक उलटला, मदत सोडून स्थानिकांचा दारुवर डल्ला

जळगाव : माणुसकीला काळिमा फासणारी घटना जळगावात घडली आहे. मद्याच्या बाटल्यांनी भरलेल्या एका ट्रकचा जळगाव जिल्ह्यातील पाडळसा गावात अपघात झाला. मात्र यावेळी स्थानिकांनी मदतकार्य सोडून ट्रकमधील दारुवर डल्ला मारला.

चालकाचं नियंत्रण सुटलेला हा ट्रक पलटी होऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रवाशांच्या अंगावर पडला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. यावेळी जमलेल्या लोकांनी अपघातग्रस्तांना ट्रक खालून काढण्यासाठी प्रयत्न सुरुही केला.

मात्र पलटी झालेल्या ट्रकमध्ये विदेशी मद्य असल्याचं लक्षात येताच जमलेल्यांनी मदतकार्य थांबवलं आणि आपला मोर्चा मद्याच्या बाटल्यांकडे वळवला. एकीकडं अपघातातील जखमी विव्हळत होते तर दुसरीकडे जमलेले लोकं दारु घेऊन जाण्यात व्यस्त होते.

घटनास्थळावर पोलीस येईपर्यंत जमलेल्या लोकांनी ट्रकमधील अर्धा माल लंपास केला. मात्र ट्रकखाली अडकलेल्यांच्या जीवापेक्षा दारुचं मूल्य खरंच एवढं मोठं होतं का, असा प्रश्न सर्वांना पडल्याशिवाय राहत नाही.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Jalgaon wine truck accident and local residents
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: truck Wine ट्रक दारु
First Published:

Related Stories

LiveTV